Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पेट्रोल पंपावरून तरुणाचं अपहरण, डोंगरपट्ट्यात नेऊन लाठ्याकाठ्या- बेल्टने अमानुष मारहाण| VIDEO

Beed Police: बीडमध्ये तरुणाला लाठ्याकाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच बीडमध्ये आणखी एका तरुणाने अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या परळीमध्ये तरुणाचे पेट्रोल पंपावरून अपहरण केले. त्यानंतर त्याला लाठ्याकाठ्याने आणि बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी येथील पेट्रोल पंपासमोरून तरुणाचे अपहरण करण्यात आले. शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता काही तरुणांनी अपहरण केले. जलालपूर भागातील डोंगरपट्ट्यात असलेल्या रत्नेश्वर मंदिर परिसरात नेऊन या तरुणाला लाठ्याकाठ्या आणि बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली. सांप्रदायिक कार्यक्रमाच्या जुन्या वादावरून तरुणाला मारहाण करण्यात आली. समाधान मुंडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी शिवराज दिवटे या तरुणाला ही मारहाण केली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.

काही नागरिकांनी तरुणाला मारहाण करताना पाहिले त्यांनी आरोपींना रोखले त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले. या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सुरूवातीला परळी येथे उपचार करण्यात आले. पण पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाईतील स्वराची रग्णालयात हलवण्यात आले. या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणी आता बीडचे पोलिस अध्यक्ष नवनीत कावंत यांनी थेट आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी असे आदेश संबंधित पोलिस स्टेशनला दिले आहेत. या प्रकरणी आरोपीविरोधात परळीच्या ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांचे विशेष दोन पथक वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT