आईच्या साडीनं मुलानं आयुष्याचा दोर कापला; सातवीतल्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Class 7 Student Found Hanging at Home: लखनौतील मस्तीपूर गावात १२ वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या वेळी त्याची आई घरात नव्हती.
Class 7 Student Found Hanging at Home
Class 7 Student Found Hanging at HomeSaam
Published On

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. निगोहां परिसरातील मस्तीपूर गावात सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलानं आत्महत्या. मंगळवारी गळफास लावून आयुष्य संपवलं. घरात आईच्या साडीनं फास लावून त्यानं आयुष्याचा दोर कापला. घटनेच्या दिवशी त्याची आई कामावर गेली होती. मुख्य म्हणजे, अडीच वर्षांपूर्वी मुलाच्या वडिलांनीही गळफास लावून आत्महत्या केली होती.

अंश असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. निगोहां पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुज कुमार तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगोहां परिसरातील मस्तीपूर गावात सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलानं मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. अंशची आई पूनम घरकाम करते. घटनेच्या दिवशी त्या कामावर गेल्या होत्या.

Class 7 Student Found Hanging at Home
लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

सायंकाळी त्या कामावर परतल्या. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं. नंतर कुऱ्हाडीने दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच पूनमच्या पायाखालील जमीन सरकली. त्यांचा लाडका मुलगा फासावर लटकलेल्या अवस्थेत होता. या घटनेबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

Class 7 Student Found Hanging at Home
धक्कादायक! महिला काँग्रेस नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल, AIनं तयार केला अन्.. नेमकं घडलं काय?

पोलिसांनी तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, अंशने सकाळी आईकडे पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला. आई आपल्या मुलावर रागावली आणि कामावर निघून गेली. परंतु, घरी परतल्यानंतर मुलानं आत्महत्या केल्याचं दिसून आलं. मुलानं आत्महत्या नेमकी का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर मस्तीपूर गावात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com