Health Tips : सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे की नाही? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

Health Tips in Marathi : सकाळी नाश्ता करणे गरजेचे नसल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मात्र, लहान मुलांना सकाळी नाश्ता करणे गरजेचे असल्याचे संशोधनात म्हटलं आहे.
Health Tips in Marathi
Health TipsSaam tv
Published On
Summary

नवीन संशोधनानुसार, प्रौढांसाठी सकाळचा नाश्ता अनिवार्य नाही

अल्पकालीन उपवास केल्यानं स्मरणशक्ती, लक्ष केंद्रीत करणे किंवा निर्णय घेण्यावर परिणाम होत नाही

शरीर केटोन्सपासून ऊर्जा निर्माण करून मेंदूचं कार्य सुरळीत चालवतं.

मुलांसाठी नाश्ता आवश्यक, तर प्रौढांसाठी अधूनमधून टाळणे सुरक्षित

गेल्या काही वर्षांपासून सकाळी नाश्ता करणे गरजेचे मानले जाते. मात्र, एका संशोधनातून नवीन माहिती समोर आली आहे. नव्या संशोधनानुसार, तुम्ही सकाळी नाश्ता करणे टाळले, तरी आरोग्य आणि मेंदूवर कोणताही परिणाम होत नाही. विशेष म्हणजे प्रौढ व्यक्तींवर कोणताही परिणाम होत नाही.

संशोधनात ६४ वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला. तर ३४०० हून अधिक लोकांच्या चाचण्या करून विश्लेषण करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्मरणशक्तीची देखील चाचणी केली. ज्या लोकांनी अभ्यासात सहभाग नोंदवला नाही. त्यांच्या मेंदू आणि आरोग्यावर परिणाम झाला नसल्याचे समोर आले. आकडेवारीनुसार, ज्यांनी सकाळी नाश्ता केला, त्यांनी इतरांच्या तुलनेत फक्त ०.२ यूनिट चांगलं काम केलं.

Health Tips in Marathi
Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यांनुसार, मानवी मेंदू हा ग्लुकोज आणि शरीरात साठवलेल्या चरबीपासून ऊर्जा मिळवतो. एखादी व्यक्ती अनेक तास अन्नाशिवाय राहते, त्यावेळी त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. परंतु शरीर केटोन्स नावाच्या पदार्थापासून ऊर्जा निर्माण करून मेंदूचे कार्य सुरळीत चालू ठेवते.

संशोधनानुसार, व्यक्तीने ८,१२ आणि १६ तास उपवास केल्याने त्याच्या स्मरणशक्ती,लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता किंवा निर्णय घेण्यावर परिणाम होत नाही. अल्पकालीन उपवास हा शरीर आणि मेंदू दोघांसाठीही सुरक्षित आहे.

Health Tips in Marathi
Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

नाश्ता वगळल्याने प्रौढ व्यक्तीवर कोणताही परिणाम होत नाही. या संशोधनात मुलांनी नाश्ता वगळणे योग्य मानले जात नाही. लहान मुलांच्या शरीर आणि मेंदूला आवश्यक पोषण देण्यासाठी नियमितपणे पौष्टिक नाश्ता करणे महत्वाचे आहे. मात्र, प्रौढांसाठी अधूनमधून नाश्ता टाळणे फारसे चिंतेचे कारण नसल्याचे संशोधनातून समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com