ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थंडीत लोकरीचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरू झाला असून लोक आता गरम आणि आरामदायक फॅशनसाठी बाहेर पडत आहेत.
लोकरीचे कपडे दुर्गंधी न येता ताजे राहण्यासाठी हे सोपे टिप्स अवलंबा आणि कपड्यांची स्वच्छता कायम ठेवा.
कपडे उन्हात वाळवा, ज्यामुळे त्यातील ओलसरपणा निघून जाईल आणि दुर्गंधी निर्माण होण्यापासून कपडे सुरक्षित राहतील.
कपडे धुताना पाण्यात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घाला, त्यामुळे दुर्गंधी दूर होते आणि कपडे ताजेतवाने राहतात.
लोकरीचे कपडे धुतल्यानंतर त्यांना मऊ आणि आरामदायक ठेवण्यासाठी सॉफ्टनरचा वापर करणे आवश्यक आहे.
हिवाळ्यानंतर कपडे व्यवस्थित मोकळ्या जागेत साठवा, जेणेकरून ओलसरपणा आणि बुरशी येण्यापासून कपडे सुरक्षित राहतील.
कपाटात कपडे ठेवताना कापूर किंवा नॅप्थालीनचे गोळे वापरा, जेणेकरून कपड्यांचा सुगंध टिकतो आणि बुरशी टळते.