Haldi Rituals: लग्नाच्या आधी हळदीचा विधी का करावा, जाणून घ्या कारण

Dhanshri Shintre

परंपरा आणि रीतीरिवाज

लग्नसमारंभात विविध परंपरा आणि रीतीरिवाज असतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा आणि शुभ मानला जाणारा विधी म्हणजे हळद लावण्याचा सोहळा.

हळदीचा सोहळा

हळदीचा सोहळा हा लग्नाचा अविभाज्य भाग असून, तो आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडणारा अत्यंत महत्वाचा पारंपरिक विधी आहे.

हळद का लावली जाते?

परंतु अनेकांना या हळद विधीमागील अर्थ आणि फायदे माहिती नसतात. हळद का लावली जाते आणि तिचा उद्देश काय आहे, ते जाणून घेऊया.

गुरू ग्रहाची संबंध

ज्योतिष मान्यतेनुसार हळद लावण्याचा समारंभ गुरू ग्रहाची ताकद वाढवण्यासाठी केला जातो, असे मानले जाते.

आवडता रंग

असा विश्वास आहे की गुरू ग्रहाला हळद व पिवळा रंग प्रिय असल्याने, वधू-वरांच्या संपूर्ण अंगावर हळद लावण्याची परंपरा पाळली जाते.

लग्नामध्ये महत्त्वाचे

ज्योतिषानुसार, विशेषत: विवाहसमयी गुरु ग्रह प्रभावी असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि त्यासाठी विविध विधी केले जातात.

मजबूत स्थिती

ज्योतिषशास्त्रानुसार, हा ग्रह शुभ आणि मजबूत स्थितीत असला तरच लग्नयोग पक्का मानला जातो, असे मानले जाते.

विवाहात अडथळे

मान्यता अशी आहे की हा ग्रह दुर्बळ झाला तर विवाहात अडथळे येऊ शकतात, पाहुणेही परतू शकतात; म्हणून हा उपाय केला जातो.

या गोष्टींवर लक्ष ठेवा

हळदीचा सोहळा होळीप्रमाणे रंगात नको साजरा करू; हा अत्यंत पवित्र विधी असून तो सन्मानाने आणि मर्यादेत पार पाडावा.

NEXT:  लग्नात नवरदेव किंवा नवरीच्या बहिणीला 'करवली' का म्हणतात? जाणून घ्या

येथे क्लिक करा