Pune Crime: ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडनं शरीरसंबंधाचे व्हिडिओ केले व्हायरल, थेट पॉर्न साईटवर टाकले, मैत्रिणीने पाहताच...

Pune Woman Intimate Videos Leaked: लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रिलेशनमध्ये असताना एका तरूणाने तरूणीचे शरीरसंबंध ठेवत असताना व्हिडिओ नकळत शूट करून पॉर्न साईटवर व्हायरल केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरूणाने तरूणीचे शरीरसंबंध ठेवत असताना व्हिडिओ शूट करून पॉर्न साईटवर व्हायरल केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती तरूणीला मिळाल्यानंतर तिने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० डिसेंबर २०२३ ते १२ मे २०२५ दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होती. तर, आरोपी विनय कुलकर्णी हा एक अॅटोमोबाईल इंजिनिअर आहे. २ वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली. हळूहळू मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमसंबंधात असताना दोघांच्या सहमतीने शरीरसंबंधही झाले. मात्र, शरीरसंबंधाच्यावेळी आरोपीने शरीरसंबंधाचे काही व्हिडिओ तिच्या नकळत शुट केले.

Cyber Crime
Tuljapur: जेवला अन् झोपला, रात्रभर वेदनेनं विव्हळत; एकुलत्या एक मुलाचा झोपेतच हार्ट ॲटॅकनं मृत्यू

काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. पीडितेने लग्नाला नकार दिल्यामुळे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोघांनीही संपर्क तोडला. याकाळात तरूणीच्या मैत्रिणीला पॉर्न साईटवर तिचा व्हिडिओ दिसला. तिने याबाबत संबंधित तरूणीला याची माहिती दिली. त्यानंतर तरूणीने थेट अलंकार पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

Cyber Crime
Crime: बकऱ्या चारणाऱ्या वृद्धासमोर नग्न होऊन व्हिडिओ करणारी तरुणी सॉफ्टवेअर इंजिनीअर, धक्कादायक माहिती उघड, सगळेच हैराण

पोलिसांनी पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विनय कुलकर्णीवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीविरोधात लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

Cyber Crime
Shivsena: मोठी बातमी! ठाकरेंच्या आमदारावर गुन्हा दाखल, लग्नाच्या वरतीत तलवारीसोबतचा डान्स भोवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com