Shivsena: मोठी बातमी! ठाकरेंच्या आमदारावर गुन्हा दाखल, लग्नाच्या वरतीत तलवारीसोबतचा डान्स भोवला

Shivsena Thackeray Faction: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन नाच केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shivsena
ShivsenaSaam
Published On

राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन नाच केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात यांच्यासह अनिल गोरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना एका लग्नाच्या वरातीत घडली आहे. एका कार्यकर्त्याच्या कार्यक्रमात आमदार खरात यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी हातात तलवार घेऊन कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून मनसोक्त डान्स केला. मात्र, सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन डान्स करणं त्यांना भोवलं. याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

Shivsena
Nagpur Crime: दारू पिताना हटकलं, पोलिसांनाच शिवीगाळ करत मारहाण, आरोपी ताब्यात

या प्रकरणी आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह अनिल गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी लग्नाच्या मिरवणुकीत हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब उघडकीस आली.

Shivsena
BF ला किस करताना वडिलांनी पाहिलं, १८ व्या वर्षी बनली ADULT स्टार; आता बॉलिवूड गाजवतेय

खरात यांचे स्पष्टीकरण

यावर स्पष्टीकरण देताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, 'माझ्या मतदारसंघातील एका कार्यकर्त्याच्या लग्नासाठी गेलो होतो. त्यावेळी नवरदेवाच्या हाती असलेली प्रतिकात्मक तलवार घेऊन थोडा आनंद व्यक्त केला. ती खरी तलवार नव्हती. काही विरोधकांनी या साध्या प्रकाराचा राजकीय बाऊ करून चुकीची छबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे', असं खरात म्हणाले.

Shivsena
Jalna News: दिवसाढवळ्या ५-६ जण घरात घुसले, तुटून पडले; बापलेकाचा जीव घेतला, जालन्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com