Beed news Saam TV News
महाराष्ट्र

Beed News: 'माहेरहून पैसे आण'; विवाहितेचा अतोनात छळ, विष पिऊन आयुष्य संपवलं; बीड हादरलं

Mental Torture for Money: बीडच्या आष्टी तालुक्यातील ३२ वर्षीय प्रियंका खाकाळ हिनं सासरच्या पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. चार जणांविरोधात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

पुण्यातील हगवणे प्रकरणानंतर राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. अशाच प्रकारची एक हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. सासरच्या मंडळींकडून पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. विवाहितेनं विषारी द्रव्य प्राशन करत आपलं जीवन संपवलं. दरम्यान या प्रकरणात सासरा, सासू, दीर, जाऊ या चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रियंका खाकाळ (वय ३२) असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील ती रहिवासी होती. तेरा वर्षांपूर्वी प्रियंका यांचा विवाह बापू खाकाळ याच्याशी झाला होता. सासरच्या मंडळींकडून नवीन घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा सतत तगादा लावण्यात येत होता. या कारणाने प्रियंकावर मानसिक दबाव टाकण्यात येत होता.

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तिनं अखेर टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तिने विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या केली. या प्रकरणानंतर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात सासरा, सासू, दीर आणि जाऊ अशा चौघांविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

SCROLL FOR NEXT