Thane School
Thane SchoolSaam Tv News

Thane: शाळा बंद, ऑनलाइन अभ्यास सुरू; ठाण्यातील नामांकित शाळेचा निर्णय, नेमकं कारण काय?

Thane School to Conduct Classes Online: ठाण्यातील सुनीतीदेवी सिंघानिया शाळेने डेंग्यूच्या संशयित प्रकारांमुळे १८ ते २८ जूनदरम्यान ऑनलाइन वर्ग सुरू केले असून खबरदारी म्हणून परिसरात फवारणी - मच्छरदाण्यांची व्यवस्था केली आहे.
Published on

ठाणे शहरातील श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया या शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांचे काही संशयास्पद प्रकार समोर आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने एक निर्णय घेतला आहे. १८ जून ते २८ जून या कालावधीत नर्सरी ते १० वी पर्यंतचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅम्पस आणि परिसरातील साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना मलेरिया आणि डेंग्यूची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केलं की, मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार आहे. 'आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शिफारस केलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब केला आहे.' ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शाळेची पाहणी केली असून, परिसरात डासांची पैदास झाल्याचे ठोस पुरावे सापडले नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Thane School
Shocking: शारीरिक संबंध ठेवताना रूमचे पडदे लावायला विसरले; ५ स्टार हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

शाळेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, 'खबरदारीचा उपाय म्हणून शाळेच्या संपूर्ण आवारात औषध फवारणी करण्यात आली असून, सर्व खिडक्यांवर मच्छरदाण्या बसवण्यात आल्या आहेत. आम्ही २८ जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेणार आहोत. पाचवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सहावी आणि दहावीच्या युनिट चाचण्या पुन्हा घेण्यात येणार आहे', असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

Thane School
सीट बेल्ट लावले, टेक ऑफ होतं तेवढ्यात...; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या Air Indiaचं उड्डाण तातडीने रद्द; खाली उतरल्यावर बघतात तर...

महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, पालकांच्या तक्रारीनंतर सोमवारी आरोग्य विभागाचे पथक शाळेत गेले आणि भांडी, फाटलेले टायर, जुनं फर्निचर यांसारख्या डास पैदास करणाऱ्या ठिकाणांची सफाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com