Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

Beed News : बीड जिल्ह्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना कोणत्या ना कोणत्या कारणातून समोर येत आहेत. अर्थात मागील काही दिवसात गुन्हेगारी वाढलेली असून एका गुन्हेगाराची जामिनावर सुटका झाल्यानंतर फटाके फोडत स्वागत करण्यात आल्याचे समोर आले

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड शहरात सराईत गुन्हेगारांचा एक कारनामा समोर आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत सराईत गुन्हेगाराची हायकोर्टातून जामिनावर सुटका झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बीड शहरातील सराईत गुन्हेगार शेख नवीद शेख चॉंद या गुंडावर बीड पोलिसांनी MPDA अंतर्गत ३ जुन २०२५ रोजी कारवाई केली होती. त्याच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारवाईनंतर हायकोर्टात त्याने जमीन अर्ज केला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शेख नवीद याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. 

दरम्यान शेख बाहेर आल्यानंतर काल सायंकाळी ५ वाजता बीड शहरातील मोमीनपुरा भागात फटाक्यांची आतिषबाजी करत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी लहान मुलांच्या हातांमध्ये स्प्रे देऊन ते उडवायला लावले. तर काहींना रंग उधळायला लावला. अशा पद्धतीने एका गुंडाचे भर रस्त्यावर मोठ्या थाटात स्वागत केलं जात होतं. यावेळी रस्त्यावर वाहतूकीला अडथळा देखील निर्माण झाला होता. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन 

याच दरम्यान जात असलेल्या एका ॲम्बुलन्सला देखील तेथून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला. दरम्यान बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. त्याचेही उल्लंघन या गुंडाने केलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी आम्ही सदरील गुंडावर आणि लोकांवर कारवाई करणार असल्याचे पेठ बीड पोलीस ठाणे प्रमुख अशोक मुदीराज यांनी फोनवरून बोलताना सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT