Solapur Heavy Rain : सोलापुरात मुसळधार; पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात टाकली रिक्षा, चालक गेला वाहून

Solapur News : सोलापूर शहरात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक परिसरासह सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून शहरातील नाल्याला देखील पूर आला
Solapur Heavy Rain
Solapur Heavy Rain Saam tv
Published On

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. जोरदार पावसाने झोडपून काढल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागात पाणी साचले आहे. दरम्यान सोलापुरात पुन्हा एकदा रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत असून छत्रपती संभाजी महाराज चौका जवळील पुना नाका येथे पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून रिक्षा टाकल्याने एक रिक्षा चालक वाहून गेल्याची घटना घडली आहे.

सोलापूर जिल्ह्याला जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. यातच सोलापूर शहर परिसरात ११ सप्टेंबरला जोरदार पावसाने झोडपून काढले होते. या पावसामुळे मार्केट परिसरात पाणी साचल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले होते. शिवाय काही भागातील घरांमध्ये पाणी गेल्याने घरातील साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले होते. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर पुन्हा एकदा सोलापूरमध्ये जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे.

Solapur Heavy Rain
Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

पुरात रिक्षा चालक गेला वाहून

मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे नाल्यांना पूर देखील आला होता. दरम्यान सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकजवळ असलेल्या नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षाचालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. यात तो वाहून गेल्याची घटना घडली आहे. सतीश सुनील शिंदे (वय ३६) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Solapur Heavy Rain
Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

पथकाकडून शोधकार्य सुरु

दरम्यान रिक्षा चालक वाहून गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सोलापूर अग्निशामक दलाकडून वाहून गेलेल्या रिक्षा चालकाचा शोध घेण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र नाल्याची पाण्याचा प्रवाह अधिक प्रमाणात असल्याने अद्याप त्याला शोध लागलेला नाही. तर सतीश शिंदे यांच्या कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com