Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Beed News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेतल्यानंतर राज्यात ओबीसीसह बंजारा व कोळी समाज देखील आंदोलन करत आहे. अशात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी टोकाचा निर्णय घेतला जात आहे.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : राज्यात आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा उभारण्यात आला होता. या तिढा संपत नाही तोच ओबीसी समाज या विरोधात उभा राहिला आहे. इतकेच नाही तर ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल उचलले जात आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात आणखी एका जाणारे टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर हैद्राबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. अर्थात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयानंतर मात्र ओबीसी समाज आक्रमक झाला असून राज्यात याचे पडसाद उमटू लागले आहेत. अर्थात राज्यात आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. 

Beed News
आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल 

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अशात आता ओबीसी बांधवांकडून टोकाचे पाऊल उचलत ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडच्या पिंपळनेर येथील गोरक्ष देवडकर यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यात हि दुसरी आत्महत्या झाली आहे.  

Beed News
Hingoli Heavy Rain : हिंगोलीत तुफान पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद, बाजार समितीतही नुकसान

मुलगी करत होती पोलीस भरतीची तयारी 

त्यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती मात्र आता ओबीसीतला आरक्षण संपत आहे या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांची मुलगी व नातेवाईकांनी सांगितले आहे. आता माझी जबाबदारी कोण घेणार माझे वडील तर गेले आहेत; अशी भावनिक प्रतिक्रिया ही आत्महत्या करणाऱ्या देऊळकर यांच्या मुलीने दिली आहे. सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे अशी मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com