बीडमध्ये पोलिस अधिकाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा
नवरदेव पीएसआयने दिला लग्नाला नकार
पोलिस अधिकाऱ्याने मुलीच्या कुटुंबाला फसवल्याचा आरोप
चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आजपर्यंत तुम्ही मुलांना लग्नामध्ये फसवल्याच्या घटना पाहिल्या असतील किंवा बोगस लग्न लावणारी टोळी बघितली असेल. मात्र बीडच्या मातोरी गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चक्क पीएसआय असलेल्या नवरदेवानेच नवरीला फसवले. लग्न अवघ्या काही दिवसांवरती आले असताना नवरदेवाकडून लग्नास नकार देण्यात आला आहे. ऐवढेच नाही तर पीएसआय नवरदेवाने मुलीच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिली. या घटनेची सध्या बीडमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
आई-वडिलांनी कष्ट करून मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमा केले होते. ते लाखो रुपये साखरपुडा त्याचबरोबर लग्नाचे साहित्य आणि इतर साहित्यांमध्ये खर्च केले. त्यामुळे मुलीचे आई-वडील न्यायाची मागणी करत आहेत. पीएसआय असलेल्या पवन निंबाळकर नावाच्या नवरदेवाने नवरीला आणि नवरीच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमिष दाखवून सोने कपडे आणि इतर साहित्य घेऊन लाखो रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी बीडच्या चकलांबा पोलिस ठाण्यात संबंधित पीएसआय पवन निंबाळकर यांच्याविरोधात मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. 'आम्ही पै,पै गोळा करून मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. मात्र आमच्या सगळं संपलं आहे. आमचा मानसिक खेळ आणि आमची बदनामी संबंधित पीएसआयने केली असून त्यांनी अनेक मुलींना अशाच पद्धतीने फसवलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.
तर संबंधित प्रकरणांमध्ये मुलींनीच आम्हाला फसवल्याची तक्रार चकलांबा पोलिस ठाण्यामध्ये पवन निंबाळकर यांचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी मला चुकीची माहिती सांगून या जाळ्यात ओढला आहे आणि माझी फसवणूक केली आहे अशी तक्रार चकलांबा पोलिस ठाण्यामध्ये दाखल असून दोन्ही तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस चौकशी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.