Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही

deepak kesarkar pa assaulted in goa: गोव्यामध्ये शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या पीएला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. स्थानिक तरुणांनी दारूच्या नशेत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली.
Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही
Goa CrimeSaam TV
Published On
  • दीपक केसरकर यांच्या पीएला गोव्यात मारहाण

  • गोव्यातील स्थानिक तरुणांनी केली मारहाण

  • या घटनेनंतर शिंदेसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

  • सिंधुदुर्ग- गोवा सीमेवर केलं आंदोलन

विनायक वंजारी, सिंधुदुर्ग

शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांच्या स्वीय सहाय्यक म्हणजे पीएला गोव्यात माराहण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गोव्यातील स्थानिक तरुणांनी दारूच्या नशेत त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी या तरुणांनी त्यांच्या कुटुंबीयांना देखील सोडले नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा मांद्रे येथे रविवारी रात्री सावंतवाडी तळवडे येथील नागरिकांना मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवर चक्काजाम करण्यात आले. शिंदेसेनेच्या युवा सैनिकांनी दोन्ही बाजूंचा महामार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला. माजी मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सूरज परब यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोवा माद्रे येथे काही गोव्यातील मद्यपी तरूणांनी मारहाण केली होती.

Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही
Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

या मारहाणीनंतर गोवा पोलिसांनी तक्रार सुद्धा नोंदवून घेतली नाही. उलट मारहाण झालेल्या तरुणांना 'ते स्थानिक आहेत. त्यांच्या भानगडीत पडू नका.', अशा प्रकारे आपल्यालाच समज देण्याचा प्रयत्न गोवा पोलिसांनी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सूरज परब यांनी केला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचही या घटनेकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्यांच्याकडूनही दखल न घेतल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखली अशी माहिती परब यांनी दिली.

Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

यावेळी गोवा- सिंधुदुर्ग सीमेवर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्धा तास वाहतूक बंद ठेवल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी बाचाबाची देखील झाली. पोलिसांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही
Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com