Beed Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: खळबळजनक! ७ वर्षांपूर्वी लग्न, सुखी संसारात विघ्न; सनकी नवऱ्याने बायकोला संपवलं, कारण काय?

Beed Police: विवाहित महिलेला बळजबरीने नवऱ्याने विष पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. याप्रकरणाचा तपास बीडचे गेवराई पोलिस करत आहेत.

Priya More

योगेश काशीद, बीड

बीडमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून बळजबरीने विवाहितेला नवऱ्याने विष पाजलं. या घटनेत विवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक आक्रमक झालेत. महिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बीड जिल्हा रुग्णालयाबाहेर महिलेच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा महिलेच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेला बळजबरीने नवऱ्याने विष पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे घडली आहे. कोमल नागेश पाटोळे असं मृत महिलेचे नाव आहे. ७ वर्षांपूर्वी कोमलचे लग्न झाले होते. कोमलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

७ वर्षांपासून कोमलच्या संसाराचा गाडा अतिशय व्यवस्थित सुरू होता. पण तिच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. कोमल आणि तिच्या नवऱ्यामध्ये घरगुती कारणांवरून सतत वाद होऊ लागले. याच घरगुती वादातून संतप्त झालेल्या कोमलच्या पतीने तिला जबरदस्ती विष पाजलं, असा आरोप कोमलच्या वडिलांनी केला.

कोमलच्या हत्येनंतर तिचे कुटुंबीय संतप्त झाले. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. बीड जिल्हा रुग्णालयाबाहेर कोमलच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी करत आक्रोश केला. सध्या गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT