Santosh Deshmukh: बीड चार्जशीटमध्ये फेरफार होऊ शकते, धनंजय मुंडेंचं नाव घेत जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप

Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil
Jarange PatilSaam Tv News
Published On

Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जात संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. 'चारशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. यात मुंडे यांचा हात आहे. त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नाद आहे', असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मुंडेंना सहआरोपी करा

'वाल्मिक कराड ज्या वाहनातून शरण गेले, ती गाडी पोलिसांनी झाकून ठेवली होती. यानंतर प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्याला सह आरोपी करण्यात आलं. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना देखील सह आरोपी करा, त्यांनी आंदोलन दडपलं होतं', असंं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

Manoj Jarange Patil
Amit Shah: अमित शहांच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतूकीत बदल, पुणेकरांनो घ्या नोंद

चारशीटमध्ये छेडछाड

'या ठिकाणी कारवाई पोलिसांकडून होत नाही. चारशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. यात धनंजय मुंडे देखील आहेत. त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नाद आहे. यातील आरोपी त्यांचेच आहेत. त्यामुळे त्यांना देखील सहआरोपी करा', अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

Manoj Jarange Patil
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या धमकी प्रकरणात ट्विस्ट, बुलडाणा कनेक्शन उघड; 'ते' दोघे नेमके कोण?

मस्साजोगचे ग्रामस्थ उपोषण करणार

जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबाची भेट घेतली.यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन केला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दाखवल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

'मस्साजोगचे ग्रामस्थ २५ तारखेला उपोषण करणार आहेत. हा विषय खूप संवेदनशील आहे. निवेदन असलं तरी सहकार्य करा', असं जरांगे पाटील म्हणाले.

तसेच 'संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करा, बाकीच्या आरोपींची सीडीआर काढा', अशी मागणी गावकरी आणि जरांगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com