Beed ex-deputy sarpanch Govind Barge made a video call before his suicide – shocking new details emerge. saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime Govind Barge Death: आत्महत्येपूर्वी गोविंद बर्गेंचा एकाला व्हिडिओ कॉल, घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं, नवी माहिती समोर

Beed Crime Ex deputy Sarpanch Death: माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी वी अपडेट समोर आलीय. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता. घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची माहिती समोर आलीय.

Bharat Jadhav

  • बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली.

  • आत्महत्येपूर्वी त्यांनी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला होता.

  • प्रेमसंबंध आणि ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या केल्याचा आरोप.

बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूमुळे राज्य हादरलं. गोविंद बर्गे यांचे नर्तिका पूजा गायकवाड प्रेम संबंध होते. त्याचं प्रेम संबंधातून त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. प्रेमिकेच्या वाढत्या मागण्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे गोविंद बर्गे यांनी स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात.

आता या प्रकरणात नवी माहिती समोर आलीय. आत्महत्या करण्यापूर्वी यांनी एक व्हिडिओ कॉल केला होता. त्या कॉलनंतर त्यांनी स्वत: वर गोळ्या झाडल्या. गोविंद बर्गे यांनी शेवटचा व्हिडिओ कॉल कोणाला केला होता. त्यामुळे त्यांचा जीव वाजला असता का असे प्रश्न केले जात आहेत. गोविंद यांनी प्रेयसी पूजा हिच्या सासुरे गावातच कारमध्ये बसून रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून घेतली होती. मात्र गोविंद यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झालाय, असा आरोप बर्गे यांच्या नातेवाईकांनी केलाय.

प्रेयसी पूजानेच गोविंद बर्गे यांचा घातपात केला, आरोप त्यांनी केलाय. त्यानुसार नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिलीय. त्यानंतर पोलिसांनी नर्तिका पूजा हिला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे. दरम्यान गोविंद यांनी आत्महत्या करण्याच्या दिवशी एक व्हिडिओ कॉल केला होता. त्यामुळे या प्रकरणात नवी वळण येण्याची शक्यता आहे.

दरम्यान प्रेयसी पूजा काही दिवसांपासून गोविंद सोबत बोलत नव्हती. त्याचा फोन उचलत नव्हती. घटनेच्या दिवशी गोविंद हे पूजेच्या घरी गेले होते. तेव्हा पूजा घरी नव्हती पण तिची आई होती. मात्र त्यांनी गोविंदशी बोलणं टाळलं. त्यांनी व्हिडिओ कॉल करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मात्र समोरून कोणीच प्रतिसाद दिला नाही. हे पाहून त्यांची निराशा आणि संताप वाढला. त्यानंतर गोविंद तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासून काही अंतरावर त्यांची कार उभी होती. त्या कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT