Nanded Crime: संतापजनक! उपसरपंच बनला हैवान; गुंगीच्या गोळ्या देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संबंधातून बाळाला दिला जन्म

Nanded Crime News: तामसा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात ५५ वर्षीय उपसरपंचाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबुराव तुपेकर, असं आरोपीचे नाव आहे.
Nanded Crime
Nanded Crime NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील ५५ वर्षीय उपसरपंचाच्या कृत्याने तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. गावतील एका अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर बलात्कार केला. यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती रहिली तिने एका मुलीला जन्म देखील दिलाय. याप्रकरणी आरोपी उपसरपंच बाबुराव तुपेकर याला अटक करण्यात आलीय.

Nanded Crime
Solapur Crime News: सोलापूर हादरलं! एकाच गावातील युवक-युवतीची एकाच दिवशी आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, हैवान उपसरपंच बाबुराव तुपेकर वर्षभरापासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता. पीडितेला गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार केला. या संबंधातून पीडिता गर्भवती राहिली तिने महिनाभरापूर्वी मुलीलाही जन्म दिला.

विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी नराधम उपसरपंचाने जन्मलेल्या बाळाला विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहर हादरलंय. आता याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात विविध कलमाने गुन्हा दाखल झालाय. तर आरोपी बाबुराव तुपेकरला अटक करण्यात आलीय.

Nanded Crime
Tehsildar Arrested: अनैसर्गिक कृत्य, मारहाण अन् जादूटोणा; मुलबाळ होत नसल्याने छळ, तहसीलदारावर पत्नीचे गंभीर आरोप

अल्पवयीन मुलीसोबत गावातीलच उपसरपंचाने अनैतिक संबंध ठेवले. त्यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र आता गावात अब्रु जाईल या भीतीने नवजात बाळाला विकल्याची चर्चा होतेय. सगळं प्रकरण दाबण्यासाठी आरोपीने बाळाला विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना घडलीय.

आरोपी उपसरपंच वर्षभरापूर्वी गावातील एका अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या खायला देत. त्यानंतर तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com