Tehsildar Arrested: अनैसर्गिक कृत्य, मारहाण अन् जादूटोणा; मुलबाळ होत नसल्याने छळ, तहसीलदारावर पत्नीचे गंभीर आरोप

Shocking Allegations Against Maharashtra Tehsildar: चंद्रपूरच्या तहसीलदाराला नांदेड पोलिसांनी अटक केली. या तहसीलदारावर पत्नीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी तहसीलदारासोबत त्याचे आई-वडील आणि जवळच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chandrapur Tehsildar Arrested: अनैसर्गिक कृत्य, मारहाण अन् जादूटोणा; मुलबाळ होत नसल्याने छळ, तहसीलदारावर पत्नीचे गंभीर आरोप
Shocking Allegations Against Maharashtra TehsildarSaam Tv
Published On

अविनाश शेंबटवाड हे चंद्रपूर जिल्ह्यात तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न नांदेडमधील एका तरुणीसोबत झाले होते. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरु झाले. अनेकदा त्यांच्यातील वाद विकोपाला देखील गेले आहेत. पत्नीसह अनेकांनी अविनाश शेंबरवाड यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यांनी काही ऐकले नाही. ते नेहमी पत्नीला मारहाण करत होते.

वारंवार दारुच्या पार्ट्या, समजून सांगितल्यावर मारहाण करणे, माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ, अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी बळजबरी करणे असे अनेक आरोप तहसीलदाराच्या पत्नीने केले आहे. मुलबाळ होत नाही म्हणून मानसिक त्रास देऊन जादू‌टोणा केल्याचाही आरोप तहसीलदारावर करण्यात आला आहे. 'मी दंडाधिकारी असल्याने माझ्याविरुद्ध कुठेही तक्रार दे काहीच होत नाही.', असे नेहमी म्हणत तहसीलदार वारंवार पत्नीला मारहाण करत होते. तहसीलदाराने दोन वेळा पत्नीवर बंदूक रोखून जीवे मारहाण्याची धमकी दिली.

Chandrapur Tehsildar Arrested: अनैसर्गिक कृत्य, मारहाण अन् जादूटोणा; मुलबाळ होत नसल्याने छळ, तहसीलदारावर पत्नीचे गंभीर आरोप
Sambhajinagar Crime : रागाने बघितल्याने दोन गटात तुफान राडा; संभाजीनगरात जुन्या वादातून कुरापत, तिघे जखमी

पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन तहसीलदार अविनाश शेंबटवाड यासह दोन डॉक्टर्स, सासू-सारे आणि इतर काही जणांविरोधात नांदेडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत नरबळी, अमानुष अघोरी जादूटोणा प्रतिबंध तसेच पिस्तुल रोखल्या प्रकरणी शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. तहसीलदाराला अटक करण्यात आल्यामुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

Chandrapur Tehsildar Arrested: अनैसर्गिक कृत्य, मारहाण अन् जादूटोणा; मुलबाळ होत नसल्याने छळ, तहसीलदारावर पत्नीचे गंभीर आरोप
Uttar Pradesh Crime: जिच्यावर बलात्कार, अश्लिल फोटो व्हायरल केले; तिच्याशीच करावं लागणार लग्न, कोर्टाचा निर्णय काय?

दरम्यान, पत्नीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तहसीलदार यांचा शोध सुरू होता. शनिवारी तहसीलदार नांदेडला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तहसीलदार राहत असलेल्या नांदेडमधील घरी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तहसीलदाराला अटक केली. हे प्रकरण सुरुवातीला पोलिस दलातील महिला कक्षाकडे गेले होते. दोघांत समेट करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. यासाठी दोन तीन नोटीसाही पाठविण्यात आल्या. परंतु नोटीसाला दाद दिली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Chandrapur Tehsildar Arrested: अनैसर्गिक कृत्य, मारहाण अन् जादूटोणा; मुलबाळ होत नसल्याने छळ, तहसीलदारावर पत्नीचे गंभीर आरोप
Bhiwandi crime : भिवंडीत कामगारांच्या दोन गटात हाणामारी; एकावर धारदार शस्त्राने वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com