
सोलापूरच्या सासूर गावात माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली.
डान्सरसोबतच्या प्रेमसंबंधातील दुरावा आणि अवाजवी मागण्या हे कारण सांगितले जात आहे.
बर्गेंच्या मेहुण्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ती त्याला आपल्या तालावर नाचवत राहिली. तो नाचला तिच्या मागण्या वाढल्या आणि त्याने शेवटी आत्महत्या केली. सोलापूरच्या सासूर गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. कलाकेंद्रातल्या डान्सरसोबत असणाऱ्या प्रेमसंबंधात दुरावा आला आणि बर्गेनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
मात्र यात ट्विस्ट आला जेव्हा कलाकेंद्रातील डान्सरच्या अवाजवी मागण्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार उपसरंपचाचा मेहुण्याना लक्ष्मण चव्हाण यांनं पोलिसांत नोंदवली ..हे नेमकं प्रकरण काय पाहूयात.
2024 मध्ये धाराशिवमधील कलाकेंद्रात उपसरपंच आणि डान्सर पूजाची ओळख
बर्गे आणि पूजाच्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात
पूजाकडून पैसे, सोने आणि जमीन यांची उपसरपंचाकडे मागणी
मागणी पूर्ण न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी
सततच्या धमकीमुळे उपसरपंचाची गोविंद बर्गे यांची आत्महत्या
२०२४ मध्ये धाराशिव येथील एका कला केंद्रामध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे आणि डान्सर पूजा गायकवाड यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. पूजाने वेळोवेळी पैसे, सोने आणि जमीन बर्गे यांच्याकडून मागितली. मागणी पूर्ण न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पूजानं दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सततच्या तगाद्यामुळे गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली, असे तक्रारदाराने म्हटले आहे.
या तक्रारीनंतर डान्सरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपसरंपचं गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला हे पोलिस तपासून उघड होईलच...मात्र या घटनेमुळे प्रेमापेक्षा पैसाचं मोठा ठरल्यायचं पुन्हा एकदा समोर आलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.