
धाराशिवमध्ये धुळे-सोलापूर महामार्गावर दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न.
चोरट्यांनी धावत्या ट्रकवरील ताडपत्री फाडून सामान चोरण्याचा प्रयत्न केला.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही व मोबाईल कॅमेऱ्यात कैद होऊन व्हायरल झाला.
पोलिसांकडून गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या दरोड्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धावत्या ट्रकवर चढून चोरट्यांनी सामान लुटले आहे. टोळी आधी ट्रकवर चढली. नंतर ट्रकवरची ताडपत्री फाडली. तसेच चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार धुळे सोलापूर महामार्गावरील येरमाळाजवळील रत्नापूर परिसरात घडली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, रत्नापूर परिसरात ट्रकच्या मागून काही वाहने धावताना दिसत आहेत. काही लोकांना ट्रकवर चोरटे बसले असल्याचं दिसून आलं. चोरटे ट्रकवरील ताडपत्री फाडून वस्तू चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. एकानं हा संपूर्ण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.
तसेच हा व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकरणी पोलिसांना कळवण्यात आलं असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ते चोरटे नेमके कोण होते? त्यांनी किती रुपयांचा मालमत्ता चोरला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सोलापूर धुळे मार्गावर याआधीही आशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. कधी वाहनातील शेळ्या चोरल्या गेल्या. तर कधी महिलांचे दागिने लंपास केले. तुळजापूर ते बीड यादरम्यान घाटरस्ता आहे. त्यामुळे वाहनाचा वेग मंदावतो. त्यामुळे या भागात चोऱ्या होण्याचे प्रमाण जास्त आहे.
स्थानिकांकडून या भागात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्याची मागणी कऱण्यात आली. पण पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार मागणी केल्यानंतरही पोलीस मात्र कोणतीही कारवाई करताना दिसले नाहीत. येरमाळा, तेरखेडसह या परिसरात महामार्गावर याआधीही अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे धाराशिव पोलिसांच्या कार्यक्षमेतवर स्थानिकांकडून नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता दिवसाढवळ्या वाहनात जबरी चोरी केली गेली. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.