'मेरे पास बंगला, गाडी', पूजा म्हणते 'तेरे जैसे ४'; गोविंद बर्गे प्रकरणात नर्तिकेचा 'तो' VIDEO व्हायरल

Beed Ex-Deputy Sarpanch: बीडच्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाला वेगळं वळणं. पूजा गायकवाडचा 'तो' व्हिडिओ व्हायरल. पूजा सोशल मीडियावर चर्चेत.
Beed Ex-Deputy Sarpanch case
Beed Ex-Deputy Sarpanch caseSaam
Published On
Summary
  • बीडच्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात नवा व्हिडिओ व्हायरल

  • नर्तिका पूजा गायकवाडवर गंभीर आरोप, ३ दिवसांची पोलीस कोठडी

  • पूजावर बर्गे कुटुंबियांचे आरोप – घर नावावर करण्यासाठी दबाव

  • पूजाचा लिप्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

बीडच्या गेवराईतील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणातील वेगवेगळे वळण समोर येत आहे. या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पूजा आणि गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. पूजा वारंवार बंगला नावावर करण्यासाठी गोविंद यांच्याकडे तगादा लावत होती. पूजामुळेच गोविंद यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असल्याचा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला. या प्रकरणात आता पूजाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.

गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर पूजा गायकवाडचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पूजा आणि गोविंद या दोघांचे प्रेमसंबंध होते. नुकतंच पोलिसांसमोर पूजा गायकवाडनं कबुली दिली. रिलेशनशिपमध्ये असताना गोविंद यांनी पूजाला बऱ्याच भेटवस्तू दिल्या. सोन्याचांदीच्या दागिन्यांसह महागडा मोबाईलही दिला. मात्र, हळूहळू पुजाची डिमांड वाढत गेली.

Beed Ex-Deputy Sarpanch case
गोविंद बर्गे प्रकरणात नर्तिकेची मोठी कबुली, पोलिसांसमोर अखेर तोंड उघडलं, नेमकं काय म्हणाली?

पूजानं गोविंद यांचा बंगला नावावर करण्यासाठी हट्ट धरला होता. याच कारणामुळे पूजानं गोविंद यांच्यासोबत बोलणं टाळलं. हळूहळू बंद केलं. याच नैराश्यातून गोविंद यांनी मोठं पाऊल उचललं. गोविंद यांच्या नातेवाईकांनी पूजावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर पूजाचे अनेक व्हिडिओ चर्चेत येत आहे.

Beed Ex-Deputy Sarpanch case
म्हाडाची बंपर लॉटरी, गोरेगावच्या रहिवाशांना जॅकपॉट लागणार; पुनर्विकास योजनेअंतर्गत घरे मिळणार

पूजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पूजा लिप्सिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती, 'मेरे पास बंगला है, गाडी है, शोहरत भी है, तुम्हारे पास क्या हैं?', तेव्हा पूजा, 'मेरे पास तुम्हारे जैसे ४ हैं', असं उत्तर देते. पूजाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Beed Ex-Deputy Sarpanch case
बायकोला इन्स्टा रिल्सचं वेड, नवऱ्याची सटकली; कुऱ्हाडीनं वार करत जागीच संपवलंं, लेकीलाही सोडलं नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com