Shivam Chikne, a 21-year-old engineering student from Beed, succumbed to injuries after being brutally attacked by five men over a love affair. FIR upgraded to include murder charges. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये सैराट! प्रेमसंबंधावरून इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, तरूणाचा मृत्यू

Beed murder Shivam Chikne death : गंगावाडीत प्रेमसंबंधावरून युवकावर पाच जणांनी अमानुष मारहाण केली. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचं कलम लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed youth Shivam Chikne dies after love affair assault : हत्येच्या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. प्रेम प्रकरणातून इंजीनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरूणाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या २१ वर्षीय तरूणाचे नाव शिवम चिकणे असं आहे. १८ जुलै रोजी शिवम चिकणे याला रस्त्यात आडवून पाच जणांनी बेदम मारहाण केली होती. शिवम याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील २१ वर्षीय शिवम चिकणे या तरुणाला प्रेमसंबंधाच्या कारणावरून पाच जणांनी बेदम मारहाण केली होती. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवम याच्यावर संभाजीनगरमध्ये एका रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात तलवाडा पोलिस ठाण्यात आधी जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार आहे.

शिवमचे वडील काशीनाम चिकणे यांच्या तक्रारीनुसार, मुलगा शिवम हा माजलगाव येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. १५ जुलै रोजी प्रेयसी एकटी असताना तिने शिवमला घरी बोलावले होते. त्यावेळी तिचे दोन नातेवाईक शिवम गणेश यादव आणि सत्यम मांगले हे तिथे आले व त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. गावकऱ्यांनी तो सोडवलाही होता. १८ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता काशीनाम चिकणे शेतात असताना त्यांना मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. ते तत्काळ गेवराई येथील खासगी रुग्णालयात पोहोचले असता, शिवम बेशुद्धावस्थेत आढळला. ज्ञानदेव चिकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजता शिवम दुचाकीवरून जात असताना, शिवम गणेश यादव याने त्याची गाडी अडवून शिवीगाळ केली. त्यावेळी गणेश सुखदेव यादव, राजाभाऊ उत्तम यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव हेही तिथे आले. शिवम यादव, सत्यम मांगले आणि राजाभाऊ यादव यांनी लाठ्या-काठ्यांनी, तर गणेश सुखदेव यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव यांनी हाता-बुक्क्यांनी मारहाण केली होती. जखमी शिवमवर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.

मुलीच्या वडिलाला तलवाडा पोलिसांनी अटक केली आहे, तसेच घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामाही केला. या प्रकरणात अगोदरच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंद आहे. मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता यात खुनाचे कलम वाढवणार असल्याचे उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 4th Test : टीम इंडियाला सलग दोन धक्के, लागोपाठ दोन स्टार खेळाडू संघातून बाहेर; गिलचं टेन्शन वाढलं

Saving Scheme : रोज करा १२१ रुपयांची बचत अन् मुलीच्या लग्नापर्यंत २७ लाख जमा होतील; कशी आहे LICची खास 'कन्यादान पॉलिसी'

Security Tips: तुमचे बँकिंग आणि सोशल अकाउंट 'असे' सुरक्षित ठेवा, सरकारने सांगितले महत्वाचे पासवर्ड टिप्स

White Colour Saree: श्रावणात सणासुदींला नेसा खास पांढऱ्या रंगाच्या मनमोहक साडी

Mira Road : घरी बोलावलं अन् डाव साधला, पायलटकडून २३ वर्षीय एअर हॉस्टेसवर बलात्कार; मीरा रोड हादरलं

SCROLL FOR NEXT