Aditya thackeray devendra fadnavis : आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती समोर आली अन् महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला सुरूवात झाली. दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना ठाकरेंना युतीची ऑफर दिली होती. दुसऱ्याच दिवशी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची अफवा उडाली अन् राज्याचे राजकारण पुन्हा चर्चेत आले. पण याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. दोन्ही नेत्यांमध्ये भेट झालीच नसल्याचे समोर आले आहे. (Did Aditya Thackeray and Devendra Fadnavis meet in Mumbai hotel?)
मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरेंसोबत कोणतीही भेट अथवा बैठक झालीच नाही. आम्ही दोघे समोरासमोरही आलो नाही. आदित्य ठाकरे आणि मी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आलो होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये दोन तास गुप्त चर्चा भेट झाल्याची बातमी समोर आली होती. पण हे अफवाच असल्याचे समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कोणताही भेट अथवा चर्चा झाली नसल्याचे समोर आले आहे. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी हा दावा खोडून काढला आहे, ही फक्त अफवा असल्याचे सांगितलेय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये कोणतीही भेट झाली नाही. माझ्या मित्रांसोबत डिनरसाठी आलो होते. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये भेटीच्या बातम्या ऐकत होतो. एक व्यक्ती आता बातम्या पाहून गावी जाईल असे वाटतेय, म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला.
मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये होते, पण त्यांची भेट अथवा समोरासमोर आले नाहीत. दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये असल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. पण ही अफवाच असल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेट झाल्याची बातमी समोर धडकली अन् राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. पण भेट अथवा चर्चा झालीच नाही, हे समोर आले आहे. ठाकरे आणि फडणवीस यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.