Is the Thackeray brothers’ reunion in Maharashtra scripted by Fadnavis? : महाराष्ट्राच्या राजकारणात युती आघाड्यांचे अनेक प्रयोग झाले. काही यशस्वी ठरले तर काही फार काळ टिकल्या नाहीत. या युत्या- आघाड्यांच्या प्रयोगात एक राजकीय समीकरण काही जुळून आलं नाही. त्यासाठी प्रयत्न झाले नाही? असं नाही; प्रयत्न झाले. हे राजकीय समीकरण जुळून यावं अशी दोन्हीकडील नेते कार्यकर्त्यांची इच्छा होती, आहे. प्रत्येकवेळी त्यात बिबा पडला आणि गोष्टी फिस्कटत गेल्या. गेल्या काही वर्षात तर त्यात इतका दुरावा आला की आता ही युती होणं शक्य नाही, अशीच परिस्थिती होती. मग अचानक सरकारकडून एक निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळे सामाजिक एकजूट बघायला मिळालीच; अनेक वर्षात आलेला दुरावा एका झटक्यात दूर झाला. दोन भाऊ एका व्यासपीठावर दिसले. याचं दृश्याने महाराष्ट्रात एका चर्चेला हवा मिळाली... ठाकरे बंधू एकत्र येणार!
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार? उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घेण्याबद्दल सकारात्मक बोलताना दिसताहेत; पण राज ठाकरे सावधपणे भूमिका मांडत आहेत. अशातच एका मुद्द्याने डोकं वर काढलं, त्याची चर्चाही जोरात सुरुये, तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणं हे स्क्रिप्टेड आहे म्हणजे आधीच ठरवून केलं गेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल जो नवा मुद्दा चर्चेच्या केंद्रास्थानी आलाय, त्याची कहाणी काय आहे आणि खरंच असं काही आहे का? हेच समजून घ्या...
मराठी-हिंदी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र आणि राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला विरोध म्हणून 5 जुलै रोजी रॅली आयोजित करण्यात आली होती. पण सरकारने हिंदी अनिवार्यतेचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्या दिवशी विजयी मेळावा झाला. यामुळे फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला, असा दावा काही विश्लेषक आणि सोशल मीडिया पोस्ट्समध्ये केला जात आहे. यात किती तथ्य आहे, खरेच फडणवीस यांनी हिंदी-मराठी वाद निर्माण व्हावा म्हणून ठाकरे बंधूंना एकत्र आणलेय का? पाहूयात तथ्य काय...
महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीवेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केले. राज ठाकरेंनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही लगेच प्रतिसाद दिला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यात हिंदी भाषा सक्तीचा सरकारचा निर्णय धडकला, यावर दोन्ही बंधूंनी आवाज उठवला. त्यानंतर ५ जुलै रोजी काय झालं, ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं.
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंनीही त्याच भाषणात एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असे म्हणत महाराष्ट्राला नव्या युतीचे स्पष्ट संकेत दिले. अधिकृत युतीसंदर्भात राज ठाकरे अथवा उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही, पण इतर नेते आणि राजकीय विश्लेषकांनी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात, असा अंदाज बांधला, पण हे फडणवीस यांनी घडवून आणल्याचा दावा केला गेला अन् राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली.
राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणं, हे पूर्व नियोजित असू शकतं, पण यामध्ये देवेंद्र फडणवीस मास्टरमाईंड आहेत, यात तथ्य दिसत नाही. राज ठाकरेंनी मीरा रोडमधील सभेत याचा उल्लेख केला. हे भाजपच्या नेत्यांनी, पत्रकारांनी फेक न्यूजसारखी गोष्ट पसरवली आहे. मराठी, महाराष्ट्रासाठ मी तडजोड करणार नाही.. त्यासाठी कुणाच्याही विरोधात जायची तयारी आहे, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे फडणवीस असल्याचा दावा राज ठाकरेंनी फेटाळला. राज ठाकरे काय म्हणाले ?
काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणले असले, तरी त्यांचा मुख्य हेतू मराठी-हिंदी वादाला हवा देणे आणि त्यातून राजकीय फायदा घेणे असू शकतो. परंतु, फडणवीस यांनी स्वतः यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे, जसे की त्यांच्या "बेगानी शादी" विधानातून दिसते. याबाबत आम्ही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याकडून मत जाणून घेतलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे निश्चितच पूर्वनियोजित होते, कारण अशा रॅलीसाठी (मराठी विजय रॅली) समन्वय आवश्यक आहे. पण, देवेंद्र फडणवीस यामागे मास्टरमाईंड असण्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. राज ठाकरे यांच्या विधानामुळे आणि फडणवीस यांच्या राज ठाकरे व उद्धव यांच्याशी झालेल्या भेटींमुळे हा दावा पुढे आला. पण राज ठाकरे यांनी उपरोधिक टोला मारला होता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.