Indapur Police  Saam tv
महाराष्ट्र

Indapur Police : पैसे न देता ऊसतोड मजुरांना ठेवले डांबून; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Baramati News : इंदापूर तालुक्यातील ऊस तोडणीला आलेलय कामगारांना वेटीस धरून ठेवण्यात आले होते. हे सर्व कामगार संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील होते. लहान आणि मोठ्यांची संख्या एकूण ४१ होती

मंगेश कचरे

बारामती : ऊसतोड मजूर कामानिमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. मात्र ऊसतोडणी निमित्ताने इंदापूर तालुक्यात गेलेल्या मजुरांबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. तालुक्यातील रेडा गावात ऊस तोडणीसाठी नेण्यात आलेल्या मजुरांना नजरकैदेत ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची गंभीर तक्रार नोंदवण्यात आली आहे. यात ४१ मजुरांची सुटका करण्यात आली आहे. 

इंदापूर तालुक्यातील ऊस तोडणीला आलेलय कामगारांना वेटीस धरून ठेवण्यात आले होते. हे सर्व कामगार संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील होते. लहान आणि मोठ्यांची संख्या एकूण ४१ होती. रघुनाथ धनाजी सोनवणे या मुकादमाने मजुरांना ऊस तोडणीसाठी पैसे देतो असे सांगून रेडा गावात पाठवले. मात्र, मजुरांचे पैसे न दिल्याने ते अडकून पडले. 

तिघांविरोधात गुन्हा दाखल 

संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले. मजुरांना कुठेही जाऊ दिले जात नव्हते. इतकेच नाही तर या मजुरांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात होते. या प्रकरणी संभाजीनगर जिल्ह्यातील नेवपूर येथील विष्णु नारायण गायकवाड यांनी सदर प्रकाराबाबत इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार रघुनाथ धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४१ मजुरांची सुटका 

दरम्यान सदर प्रकाराबाबत जनसास फाउंडेशन नावाची संस्थेमध्ये एक केस रजिस्टर झाली. त्या केसच्या बेसिसवर संभाजीनगर येथील  जनसासच्या प्रतिनिधीकडून इंदापूरमध्ये कारवाई केली. या कारवाईमध्ये नजरकैदेत ठेवलेल्या ४१ ऊसतोड मजुरांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे मजुरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Cancer : वजन कमी, पोट दुखी जळजळ आणि अस्वस्थता जाणवतेय? स्टेज 1 कॅन्सरची हेच तर लक्षण नाही? जाणून घ्या

आईला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना पाहिलं; मुलीचा गळा आवळून विहिरीत फेकलं, कलयुगी आईचा प्रताप

Virar Building Collapse: विरारमध्ये 40 वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला अन् पुढे काय घडल? VIDEO

Dhule Accident : भीषण अपघात; ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने ट्रक अनियंत्रित, दोघांचा मृत्यू

Russia- Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; टार्गेटवर कीवमधील मंत्री, कॅबिनेट इमारतीतून उठले धुरांचे लोट

SCROLL FOR NEXT