Fake Notes : एक कोटी रुपयांच्या नकली नोटा; भुसावळ रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या संशयातून कारवाई

Jalgaon News : मलकापूरकडून भुसावळकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन संशयित प्रवाशांचा रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तपासणी केली असता संशयितांच्या बॅगेत ह्या नकली नोटा आढळून आल्या
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : भारतीय चलनातील पाचशे रुपयांच्या नकली नोटा चलनात आणण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांना आलेल्या एका संशयताकडून सुमारे एक कोटीच्या नकली नोटा आढळून आल्या आहेत. पोलिसांकडून तपासणी सुरु असतानाच एकजण फरार झाला आहे. तर दुसरा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

भुसावळ रेल्वे स्थानकावर तब्बल एक कोटी रुपयांच्या जवळपास नकली नोटा आढळून आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मलकापूरकडून भुसावळकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन संशयित प्रवाशांचा रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबवत त्यांची तपासणी केली असता संशयितांच्या बॅगेत ह्या नकली नोटा आढळून आल्या आहेत. या सर्व नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

Jalgaon News
Wardha : बॉम्बने कार्यालय उडविण्याच्या धमकीचा मेल; वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना अजमल कसाब नावाने आला मेल

बंडलांच्या वर एक असली नोट 

बॅगेत असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरील एक नोट असली तर बाकी बंडलमध्ये चिल्ड्रन बँक लिहिलेल्या नकली नोटा ठेवण्यात आल्या होत्या. अशा साधारण तपासणी दरम्यान संशय त्यांच्या बॅगमध्ये सुमारे एक कोटी रुपयांच्या जवळपास नकली नोटा आढळल्या असल्याची माहिती आहे. या सर्व नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून पोलिसांकडून तपास केला जात आहे. 

Jalgaon News
Chandrapur Petrol Pump : नोटा दिल्या नाही म्हणून गाडीत भरलेले पेट्रोल काढले; पेट्रोल पंपावर दहा रुपयांचे नाणे नाकारले

एकजण झाला फरार 

रेल्वे पोलिसांना संशय आल्याने दोघांना तपासणीसाठी रेल्वे स्टेशनवर थांबविले. पोलिसांना संशय येताच एक संशयित हा फरार झाला आहे. दरम्यान दुसऱ्या संशयीताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संशयीताची रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com