Sunetra Pawar And Aakash More  Saam Tv
महाराष्ट्र

Baramati By-Poll: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, आकाश मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम

Baramati By-Poll Wont Be Unopposed: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Priya More

Summary -

  • बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही

  • आकाश मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम

  • सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेस मैदानात

  • महायुतीकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उभे राहिलेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. आकाश मोरे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते निवासस्थावरून काँग्रेस भवनकडे रवाना झाले आहेत. त्याठिकाणावरून ते प्रशासकीय भवनकडे रवाना होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'कितीही संघर्ष असला तरी निवडणुकीला सामोरं जाणार', असे सांगितले.

बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस पक्ष ठाम आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह दिसत नाहीत. सुनेत्रा पवार यांना आमचा विरोध नाही. पण भाजपच्या विचारसरणीला आमचा विरोध असल्यामुळे आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे आकाश मोरे यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या नेत्यांनी इतर पक्षांना निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले आहे.

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सांगितले की, बारामतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लोकांना वाटते की त्यांच्या मनातील प्रश्न घेऊन ही तरुण लोकं उपस्थित करतील. लोकं म्हणतात तुम्ही निवडणूक लढा. त्यापद्धतीने आम्ही मतदान करून. मतदानाच्या माध्यमातून त्यांना कळेल की आपण किती बॅकफूटला आहे आणि आपण किती लोकांची फसवणूक केली आहे. त्यापद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

तसंच, 'आमच्या कर्तबगार नेत्याला न्याय मिळत नसेल. बारामती नाही, पुणे जिल्हा नाही तर आख्या महाराष्ट्रातील ते नेते होते. त्या व्यक्तीला न्याय मिळत नसेल आणि त्यांनी घडवलेल्या बारामतीत अपघात प्रकरणी गुन्हा दाखल होत नसेल हे दुर्दैवी गोष्ट आहे. यासाठी आम्ही प्रतिकात्मक या गोष्टी करत आहोत. कितीही संघर्ष असला तरी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत.', असे आकाश मोरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT