Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवून सुरक्षा रक्षकाला मारहाण

Attacked On Shashi Tharoor : निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. एका सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली आहे.
Security personnel stand guard as investigation begins after attack on Shashi Tharoor’s convoy.
Security personnel stand guard as investigation begins after attack on Shashi Tharoor’s convoy.
Published On
Summary
  • शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला

  • सुरक्षा रक्षकाला मारहाण

  • निवडणूक प्रचारादरम्यान घटना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. यूडीएफ उमेदवार ए.पी. अनिल कुमार यांच्या निवडणूक प्रचारासाठी जात असताना थरूर यांच्या ताफा अज्ञातांनी अडवला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

Security personnel stand guard as investigation begins after attack on Shashi Tharoor’s convoy.
राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

शशी थरूर केरळममधील मलप्पुरम जिल्ह्यातील वंडूर भागातून दोन वाहनांच्या ताफ्यासह प्रवास करत होते. थरूर पहिल्या गाडीत बसले होते. अचानक दोन कारमधून आलेल्या 8 जणांनी भररस्त्यात थरूर यांची गाडी अडवत हल्ला केला. हल्लेखोरांनी कार थांबवून कारच्या काचेवर हात मारले. त्यांची कार पुढे जाण्यास मज्जाव केला. जेव्हा थरूर यांचे गनमॅन सुरक्षेसाठी बाहेर आले. तेव्हा एका गनमॅनवर जमावाने हल्ला केला. त्याला कारच्या बाहेर ओढून त्याला मारले.

Security personnel stand guard as investigation begins after attack on Shashi Tharoor’s convoy.
काँग्रेसच्या खासदाराचा तडकाफडकी राजीनामा! राजकीय वर्तुळात खळबळ

थरूर यांनी हा सुनियोजीत हल्ला असल्याचा आरोप केला. विरोधकांनी हल्ला केला असल्याचा आरोप थरूर यांनी केला. वांडूर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या जमावातील दोघांना सध्या ताब्यात घेतले आहे. हल्ला का करण्यात आला याचा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि स्थानिकांचे जबाब नोंदवले जात आहेत. शशी थरूर यांनी याप्रकरणात सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com