Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

Baramati By-Election: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय तणाव निर्माण झाला आहे. आघाडीतील समीकरणे बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव वाढला आहे.
Sunetra pawar speech
Political developments intensify as Sanjay Raut’s remarks impact Sunetra Pawar ahead of Baramati by-election. Saam tv
Published On
Summary
  • बारामती पोटनिवडणुकीत राजकीय हालचाली वेगात

  • संजय राऊत यांच्या विधानामुळे तणाव वाढला

  • सुनेत्रा पवार पाठिंब्यासाठी प्रयत्नशील

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. राहुरी निवडणुकीत भाजपनं अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी दिली आहे. तर बारामती पोट निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असणार आहेत. त्या उद्या सोमवारी उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.

Sunetra pawar speech
काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला; पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक नेत्यांविरुद्ध शेकडो कार्यकर्त्यांच्या तक्रारी

दोन्ही जागा बिनविरोध होण्यासाठी भाजपसह महायुती आग्रही आहे. सुनेत्रा पवार याही पाठिंब्यासाठी फोनाफोनी करत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंनाही पाठिंब्यासाठी फोन केला आहे. त्याचदरम्यान खासदार संजय राऊत यांच्या एका विधानामुळे सुनेत्रा पवार यांटे टेन्शन वाढले आहे. बिनविरोध निवडणुका होणं चुकीच असल्याचं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवले आहे. राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील आमदारांचं दुर्दैवी निधन झाल्याने येथे पोटनिवडणुका होताहेत.

अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीने काळाने हिरावून घेतलं. त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे. आदर आहे, पण निवडणुका लढायच्याच नाहीत, बिनविरोध झाल्या पाहिजेत, हा अट्टाहास चुकीचा आहे. निवडणूक काळामध्ये मतदारांचा एक मोठा वर्ग असतो, त्यांना सरकारला मतदान करायचं नसतं. त्यांनी काय करायचं? सरकारविरोधात शेतकरी, कष्टकरी तरी चिडलेला आहे, संतप्त आहे.

Sunetra pawar speech
Baramati bypoll : सुनेत्रा पवारांविरोधात १९ उमेदवार मैदानात, संपूर्ण यादी समोर, वाचा कोण-कोण रिंगणात?

त्यांच्यावरती बिनविरोध निवडणुका म्हणजे त्यांच्यावरील अन्याय आहे. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्यापासून रोखणं ठरतं, अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली. राहुरी ही जागा गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, त्यामुळे पहिला निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.

आज शरद पवार यांच्या पक्षाची यासंदर्भात बैठक होणार आहे. आमच्या पक्षातर्फेही तिथे तीन उमेदवार इच्छुक आहेत. समन्वयाने निर्णय घेतला जाणार आहे, मात्र प्राजक्त तनपुरे निवडणूक लढणार की नाही, यावर राष्ट्रवादीचा काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल." राहुरीच्या जागेवर (शरद पवार गट प्राथमिक हक्क असला तरी, शिवसेनेकडेही सक्षम उमेदवार तयार असल्याचे संजय राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com