काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला; पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक नेत्यांविरुद्ध शेकडो कार्यकर्त्यांच्या तक्रारी

Congress Internal Rift: नंदुरबारमध्ये काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांवर भाजपच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप केला आहे. पक्षाच्या हायकमांडकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
Congress Internal Rift:
Congress workers raising concerns and submitting complaints against local leadership amid rising internal conflict.Saam tv
Published On

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

राज्यातील काँग्रेस पक्षात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आल्यानं अनेकांची उचलबांगडी किंवा नेत्यांची बंडाळी होण्याची शक्यता आहे. पक्षातील स्थानिक नेते भारतीय जनता पक्षाचं काम करतात, यामुळे नाराज झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे त्यांची तक्रार केली आहे. ही राजकीय व्यथा आहे नंदुरबारमधील काँग्रेसची.

Congress Internal Rift:
सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित; हा बडा नेता देणार टक्कर?|VIDEO

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफाळून आल्याचं चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे पत्रद्वारे तक्रार करत काँग्रेसचे काही नेते भाजपाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. . काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित हे भाजपाची बी टीम म्हणून कार्यरत असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी या संदर्भातील काही पुरावेही पक्षाकडे सादर केल्याचा दावा केला त्यांनी केला आहे.

Congress Internal Rift:
Maharashtra Politics : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उलथापालथ होणार, तब्बल ७००० नव्या नियुक्त्या होणार, कुणाला बसणार झटका?

त्यामुळे संबंधित नेत्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले असून, पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात काँग्रेसचे नेत्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

दरम्यान नंदुरबारमधील काँग्रेसचे वाद पाहता राज्याती पक्षश्रेष्ठींवर लवकरच भाकरी फिरवणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्र क्राँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती हाती आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे ‘सपकाळ पॅटर्न’ राबवत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल ७००० नव्या नियुक्त्या करणार आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या बदलांसाठी केवळ महाराष्ट्रासाठी विशेष परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com