अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर बारामतीची झालेली रिक्त जागा राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे लढणार आहे. तर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आता काँग्रेसने कंबर कसली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस या मतदारसंघातून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. पक्षाकडून त्यांना निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आल्याचे समजते. बारामती हा प्रामुख्याने पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे मतदारसंघातील चुरस वाढणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.