पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

tuesday horoscope : काही राशींच्या लोकांचा मानसिक ताण कमी होईल. काहींना पार्टनरची साथ मिळेल.
Horoscope
Horoscope in Marathi Saam tv
Published On

मेष : आजचा दिवस आनंदी जाईल. बऱ्याच दिवसानंतर मन प्रसन्न राहील. जुने मित्र भेटायला येतील.

वृषभ : तुमच्यातील नेतृत्व गुण दिसून येतील. समस्या सोडवण्यासाठी नवी संधी मिळतील. काही प्रमाणात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. लोकांसोबत विनाकारण वाद घालू नयेत.

मिथुन : करिअरबाबत मोठा निर्णय घ्याल. पार्टनरची साथ मिळेल. ताणतणाव कमी होईल.

कर्क : नोकरीबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. कुटुंबाची साथ फायदेशीर ठरले. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.

सिंह : आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येतील. मनातील चिंता कमी होण्यास सुरूवात होईल. समाजात मान सन्मान वाढण्यास सुरुवात होईल.

कन्या : कार्यालयात मतभेद टाळावेत. पैसे कोणालाही उधार देऊ नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

Horoscope
Wednesday Horoscope : लाल रंगाची वस्तू जवळ ठेवा, धनलाभ होईल; 5 राशींच्या लोकांसाठी बुधवार ठरणार गेमचेंजर

तुला : व्यवसायात पैसा खेळता राहील. नातेवाईकांशी मतभेद निर्माण होऊ शकतात. उधार पैसे घेणे टाळा. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

वृश्चिक : घर खरेदी करण्यासाठी आजचा मुहूर्त चांगला आहे. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा. नकारात्मक विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहणे टाळा.

धनु : विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मित्रांवर विशेष विषयांवर चर्चा होईल. तुम्हाला संयमाने निर्णय घ्यावे लागेल.

Horoscope
Wednesday Horoscope : धनलाभ होणार, वादापासून दूर राहावे लागेल; ५ राशींच्या लागणार बंपर लॉटरी

मकर : तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवावा लागेल. नकारात्मक विचार मनात आणू नये. व्यापारात नुकसान होऊ शकते, यामुळे सावधान राहण्याची गरज आहे.

कुंभ : मानसिक तणाव कायमचा दूर होईल. व्यापाऱ्यांचे आजपासून अच्छे दिन सुरू होतील. कोणत्याही कामात घाई करणे टाळावे.

मीन : खर्चावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. प्रवासात एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यापाराशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. लेखाच्या आधारावर दिवसभरात कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com