Wednesday Horoscope : धनलाभ होणार, वादापासून दूर राहावे लागेल; ५ राशींच्या लागणार बंपर लॉटरी

Wednesday Horoscope in Marathi : धनलाभ होण्याची शक्यता आहे. वादापासून दूर राहावे लागेल. काही राशींच्या लोकांच्या बंपर लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
Horoscope
Horoscope in Marathi Saam tv
Published On

मेष : क्रिएटिव्ह व्यक्तीला कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन ठेवावे लागेल.

वृषभ : नात्यातून बाहेर पडण्यासाठी विचार करू शकता. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची अचानक भेट होऊ शकते.

मिथुन : दिवसभरा भुतकाळात घडलेल्या गोष्टीवर चर्चा करणे टाळा. मॅनेजमेंटच्या नजरेत चांगले राहा. मालमत्ता विकण्यात यशस्वी व्हाल.

कर्क : नात्यातील दुरावा कमी होईल. प्रोफेशनल आयुष्यात नकारात्मक विचार करणे टाळावे. धन आणि आरोग्याबाबत सकारात्मक राहिल्यास फायदा होईल.

सिंह : पार्टनरला वेळ द्यावा लागेल. नवे मित्र होतील. नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या : कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. नवा बिझनेस सुरु करण्याचा विचार कराल.

तुला : कार्यालयात नव्या जबाबदारी अंगावर येऊन पडतील. किरकोळ समस्येने दिवस खराब होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : प्रोफेशनल आयुष्य वादविवादापासून दूर ठेवावे. पैसे काळजीपूर्वक खर्च करावे लागेल. अविवाहित तरुणांना लग्नाचे प्रस्ताव येतील.

धनु : व्यवसायात नवा बिझनेस पार्टनर मिळू शकतो. पैसा कमावण्यात अडचणी येऊ शकतात. दिवसभरात नफा कमी मिळू शकतो.

मकर : नोकरीशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. मित्रांना आर्थिक बाबतीत सल्ला देणे टाळा.

कुंभ : ऑफिसमध्ये आव्हानाचा करावा लागेल. स्पर्धा परिक्षेत यश मिळू शकतं. परदेशात प्रवासाचा योग आहे.

मीन : नव्या टास्कमुळे ऑफिसमध्ये अधिक वेळ थांबावे लागेल. तुम्हाला नवा बिझनेस सुरु करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com