बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे सुरुवातीला बोलले जात होते. मात्र, काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केल्यानं येथील बिनविरोध निवडणुकीचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शरद पवार हे स्वतः काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मैदानात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.