राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

SRPF Recruitment Exam Controversy : महाराष्ट्रात आणखी एक परीक्षेतील अनियमितता समोर आली आहे. दौंड येथील एसआरपीएफ भरतीची लेखी परीक्षेत १०० पैकी ८५ प्रश्न एका खाजगी गाईडबुकमधून घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
SRPF Recruitment Exam Controversy :
SRPF RECRUITMENT EXAM CANCELLED AFTER 85 QUESTIONS FOUND FROM SAME BOOKsaam tv
Published On
Summary
  • एसआरपीएफ भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिकेवर गंभीर आरोप झाले आहेत.

  • १०० पैकी ८५ प्रश्न एका खासगी पुस्तकातून घेतल्याचा दावा करण्यात आला.

  • दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची परीक्षा रद्द करण्यात आली.

NEET पेपर फुटी प्रकरणात नव नवीन खुलासे होत आहेत. खासगी क्लासेसमध्येच विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची बाब समोर येत आहे. नीट पेपर प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेतही घोळ झाल्याची बाब समोर आली आहे. SRPF च्या परीक्षेत विचारण्यात आलेली प्रश्न एकाच पुस्तकातील प्रश्न घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलSRPF) गट क्रमांक 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

SRPF Recruitment Exam Controversy :
राज्यातील पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल; IPS सह ९६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; यादी आली समोर

प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे घेतल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामुळे आता 24 मे 2026 रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. ही परीक्षा दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड येथे घेतली जाईल. याविषयीचे वृत्त एका मराठी वृत्त संस्थेने दिले आहे.

2 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न हे एका खासगी प्रकाशकाच्या ‘पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10’ या पुस्तकातून घेत आले होते. या पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे प्रश्नपत्रिकेत आल्याचे निदर्शनात आले. या प्रकरणामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

SRPF Recruitment Exam Controversy :
Maharashtra Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका, आयपीएस अधिकाऱ्यांसह ४४ पोलिसांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

यानंतर उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 4 मे रोजी सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उमेदवारांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. नवीन वेळापत्रकानुसार एसआरपीएफ गट 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 24 मे 2026 रोजी दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड येथे घेण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com