Aurangabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime : संशयाचं भूत मानगुटीवर; उच्चशिक्षित पतीनं पत्नी आणि अडीच वर्षांच्या मुलाला संपवलं

ही घटना औरंगाबाद शहरातील कांचनवाडी भागात घडली.

डॉ. माधव सावरगावे

Aurangabad Crime News : औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित पतीने आपलाच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना औरंगाबाद शहरातील कांचनवाडी भागात घडली. सातारा पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या आईचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा आणि अडीच वर्षाच्या बाळाचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपीने खुद्द पहाटे २ वाजता पोलिसांना आपण खून कलेल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद जिल्हा हादरलं आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल चार्जरच्या वायरने पतीने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली आहे.

सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात आरोपी हा आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. यावरूनच काल पुन्हा जोरदार वाद झाले आणि याच रागाच्या भरात पतीने पत्नी आणि मुलगा यांची गळा आवळून हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

SCROLL FOR NEXT