Vishwas Mehendale : दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vishwas Mehendale Passed Away
Vishwas Mehendale Passed AwaySaam Tv
Published On

Vishwas Mehendale Passed Away : दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आज (9 डिसेंबर) सकाळी मुलूंड येथे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते आजारी होते. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आजच मुलुंड येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Vishwas Mehendale Passed Away
Zilla Parishad School : गुरुजी तुमचं हे वागणं बरं नव्हं! आक्रमक ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे (पाहा व्हिडिओ)

डॉ. विश्वास मेहेंदळे हे दिल्ली आकाशवाणीवरून मराठी बातम्या वाचणार ते पहिले निवेदक होते. तसेच मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. तेथेच त्यांनी केंद्र संचालक म्हणूनही काम पाहिलं. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचा पदभारही त्यांनी सांभाळला होता. साहित्यिक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.18 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. सुरूवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये त्यांनी काम केले. शिवाय त्यांनी काही नाटकांमध्येही काम केलं आहे.

Vishwas Mehendale Passed Away
Pune : शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा; पुण्यातील CBSEच्या आणखी 10 शाळा रडारवर

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत डॉ.विश्वास मेहंदळे यांना श्रद्धांजली वाहीली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की,”दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक तसेच प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com