Pune : शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा; पुण्यातील CBSEच्या आणखी 10 शाळा रडारवर

पुण्यातील CBSEच्या आणखी 10 शाळा रडारवर
Pune
Pune Saam Tv

Pune News : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात काही दिवसांपूर्वी 3 सीबीएसइ माध्यमाच्या शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर आता पुण्यातील सीबीएसइच्या आणखी १० शाळा रडारवर आहेत.

Pune
Bigg Boss Marathi 4: सातारच्या बच्चनची बिग बॉसच्या घरातल्या एक्झिटनंतर पोस्ट चर्चेत; म्हणतो 'आज या किरण्याला हरण्याच्या दु:खापेक्षा...'

सीबीएसइच्या १० शाळांची करण्यात चौकशी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी ही चौकशी केली आहे. तसेच चौकशीमध्ये काय समोर आलं हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. याधी पुण्यातील सीबीएसइच्या तीन शाळा बेकायदेशीर असल्याचं समोर आलं होत आणि त्यामुळे बोगस शाळा घोटाळ्याची व्याप्ती वाढते की काय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. या शाळांना 12 लाखांमध्ये प्रमाणापत्र वाटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Pune
Indigo Flight Ruckus : आता इंडिगो विमानात दारूड्या प्रवाशांचा धिंगाणा, नेमकंं काय घडलं?

'त्या' ३ बोगस शाळा कोणत्या?

एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.

बारा लाख रुपयात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपये मध्ये सिबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचं समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com