Accident News
Accident NewsSaam tv

Accident News: काकाची भेट घेवून निघालेल्या पुतण्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

काकाची भेट घेवून निघालेल्या पुतण्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
Published on

औरंगाबाद : शस्त्रक्रिया झालेल्या काकाला भेटून परत निघालेल्या त्रिकोणी कुटुंबाला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात पुतण्याचा मृत्यू झाला. अपघात (Accident) औरंगाबादमध्ये मिटमिटा पडेगाव भागात घडला आहे. (Live Marathi News)

Accident News
Hingoli News: उच्‍चशिक्षीत तरुणाने नोकरी सोडली; ‘एमबीए’चे मॅनेजमेंट शेतीत वापरून लाखोची कमाई

औरंगाबाद (Aurangabad) येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या काकाची शस्‍त्रक्रीया झाली होती. यामुळे काकाला भेटावयाच्‍या निमित्‍ताने पुतण्या विष्णू त्रिंबक वाघ (रा. मकरणपूर, ता. कन्नड) हे पत्‍नीसह औरंगाबाद येथे गेले होते. काकाची भेट घेवून परत झालेल्‍या विष्णू वाघ यांच्‍या दुचाकीला गाडीने धडक दिली. यात ते रस्‍त्‍यावर फेकले गेल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यू (Accident Death) झाला.

https://www.youtube.com/watch?v=UaYeiGP4Qhkपत्‍नी व आठ महिन्‍याची चिमुकली जखमी

मिटमिटा पडेगाव भागात घडलेल्‍या अपघातात पतीचा जागीचा मृत्‍यू झाला. तर त्‍यांच्‍यासोबत असलेले त्यांची पत्नी आणि आठ महिन्यांची मुलगी जखमी झाले आहेत. त्‍यांना उपचारासाठी दवाखान्‍यात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com