महाराष्ट्र

Ashok Kharat Video Viral: काचेच्या केबिनमधील अशोक खरातचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल कसे झाले?

Ashok Kharat Video Viral: सोशल मीडियावर काही ग्रुप्स आणि प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडिओ शेअर करण्यात आलेत. नाशिक सायबर पोलिसांनी ७४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Bharat Jadhav

  • काही व्हिडिओ आक्षेपार्ह असून काही मॉर्फ करून तयार केलेले असल्याचं समोर आलं आहे.

  • शोक खरात प्रकरणात व्हिडिओ व्हायरल होण्याचा धक्कादायक प्रकार

  • पीडित महिलांचे आक्षेपार्ह आणि मॉर्फ व्हिडिओ प्रसारित

अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर त्याचे राजकीय लागेबंध समोर आले. त्यानंतर याच प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागलं आहे. पीडित महिलांचे आक्षेपार्ह आणि मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नाशिकच्या सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान अशोक खरातचे संबंधी राजकीयनेत्यांशी असल्याने हे त्याचा हा काळा कारनामा समोर आला नव्हता. शोषित महिलांनी पुढे येत ढोंगी बाबाचा कारनामा जगासमोर आणला. खरात प्रकरणाचा तपास करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी प्रकरणाचा तपास कसा चालू आहे. तो महिलांना कशा प्रकारे आपल्या जाळ्यात अडकावयाचा याचा खुलासा केला. सोशल मीडियावर खरातेच महिलांसोबतचे व्हिडिओ व्हायरल झालेत. हे व्हिडिओ कसे बाहेर याची माहिती पोलीस आयुक्त कर्णिंक यांनी दिली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले व्हिडिओ लीक झालेले नसल्याचं कर्णिक म्हणालेत.

ऑफिस बॉयच्या पत्नीवर खरातची वाईट नजर

अशोक खरातच्या ऑफिस बॉयनेच हा प्रकार उघडकीस आणला आहे. नीरज जाधव असं या ऑफिस बॉयच नाव आहे. तो बऱ्याच दिवसापासून खरातकडे नोकरीला होता. त्यानेच खरातचे व्हिडिओ रिकॉर्ड केलेत. नीरज जाधव हा खरातच्या अनेक कांडाचा साक्षीदार आहे. पण त्यानेच हे व्हिडिओ बाहेर का आणले? त्याबाबत पोलीस आयुक्तांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

खरातने ऑफिस बॉयच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीसोबत अश्लील कृत्य केले होते. या घटनेनंतर ऑफिस बॉयनं खरात प्रकरण समोर आणण्याचा निर्णय घेतला. त्याने पुरावे गोळा करून ते जपून ठेवले. पण आपल्या जीवाला धोका असल्यानं ऑफिस बॉयनं प्लॅन आखत खरातचे व्हिडिओ विविध व्यक्तींकडे पाठवले. त्यां वितरित केले. त्यानंतर ते व्हिडिओ एकामागून एक व्हायरल केले जाऊ लागले.

दरम्यान काही लोक मॉर्फ केलेले व्हिडिओ व्हायरल करत आहेत. तर काही जण त्या व्हिडिओमधील महिलांची नावे शोधून त्यांचे व्हिडिओ शेअर करत आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी व्हिडिओ शेअर करणाऱ्यांविरुद्धात कारवाई सुरू केली आहे. AI आणि मॉर्फिंगचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार केले जात असल्याचंही समोर आले आहे. हे व्हिडीओ इतके वास्तव वाटतात की सामान्य नागरिक सहज फसतो. मात्र कायद्याच्या दृष्टीने व्हिडीओ बनवणारा आणि फॉरवर्ड करणारा दोघेही गुन्हेगार ठरतात. दरम्यान सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 74 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

SCROLL FOR NEXT