Ladki Bahin Yojna  SaamTV
महाराष्ट्र

५५ हजार अवैध लाडकी बहिणींचे अर्ज रद्द, आठवा हप्त्यापासून वंचित, पडताळणीनंतर लाडकीचे अर्ज बाद

Ladki Bahin Yojna : मराठवाड्यात तब्बल ५५ हजार ३३४ लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. या बहिणींना योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही. तर ५४ हजार ५९८ अर्ज मान्य झालेले नाहीत.

Prashant Patil

मुंबई : लाडक्या बहिणींनो लाभार्थ्यांच्या निकषात बसत नसाल तर आताच सावध व्हा.. कारण तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.. तुम्ही अपात्र ठरू शकता. आम्ही असं का म्हणतोय पाहा हा खास रिपोर्ट.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची आता काटेकोरपणे छाननी सुरू झाली आहे. त्यामुळे हजारो लाभार्थी लाडकींचे अर्ज बाद ठरत आहेत. राज्यातील गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली होती. मात्र आता या योजनेचा आर्थिक भार सरकारला पेलवत नसल्यानं बोगस लाडकींना वगळलं जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहनं आहे का? याची पडताळणी केली जात आहेत. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागून अर्जांची छाननी केली जात आहे. या पडताळणीत एकट्या मराठवाड्यात ५५ हजार लाडक्या अवैध ठरल्या आहेत.

मराठवाड्यात तब्बल ५५ हजार ३३४ लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. या बहिणींना योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही. तर ५४ हजार ५९८ अर्ज मान्य झालेले नाहीत. त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही.

महिला आणि बालकल्याण विभागानं निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातही ७५ हजार बोगस लाडक्या सापडल्या आहेत. राज्यात हा आकडा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाल्या लाडकींचा हप्ता तर बंद होणारच मात्र इतरही नियमबाह्य लाडकींची आता खैर नाही.

लाडक्या बहिणींची कोणत्या ५ टप्प्यांवर पडताळणी होणार?

एका कुटुंबात एकपेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी

बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे

कुटुंबातील एकाला निवृत्तीवेतन असल्यास

अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास

५ एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत.

दरम्यान, अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. निकषांमुळे काही लाडक्या बहिणींनी स्वत:हून योजनेचा लाभ सोडून दिला आहे. तर एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे पाच लाख लाडकींना सरकारनं अपात्र केलं आहे. एकूणच राज्यसरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता सरकारलाच डोईजड होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhadgaon News : भडगाव शहर स्फोटाने हादरले; हॉटेलमधील भीषण स्फोटात १० जण जखमी

Viral News : देने वाला जब भी देता...! तासभर पडला पैशांचा पाऊस, लोकांची उडाली झुंबड; अनेकांनी नोटा टाकल्या खिशात

Nana Patekar : माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे... Ind Vs Pak सामन्याला नाना पाटेकरांचा तीव्र विरोध, VIDEO

Naam Foundation: समाजसेवेचा दशकभराचा प्रवास, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम फाऊंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा संपन्न

Laxman Hake: मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य, लक्ष्मण हाकेंविरोधात बीडमध्ये गुन्हा

SCROLL FOR NEXT