मुंबई : काल करुणा शर्मा म्हणाल्या धनंजय मुंडेंचा २५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार. हे ऐकून मला जराशी काळजी वाटली. या स्त्रीला ते जगू देतील की नाही? याची भीती वाटली. मला वाटतंय त्यांना सिक्युरिटी देणं गरजेचं आहे. त्यांनी एवढ्या बिनधास्तपणे बोलायला नको होतं. काल त्या माध्यमांशी बोलताना अनेकवेळा म्हणाल्या, मी त्यांचे अनेक प्रकरणे बाहेर काढेल, असं म्हणत अंजली दमानिया यांनी करुण शर्मा यांच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. हे ऐकल्यावर मला वाटलं कदाचित हे त्याचं काही बरं वाईट करतील, म्हणून मला वाटतं त्यांना सिक्युरिटी दिली गेली पाहिजे, असं देखील दमानिया बोलल्या आहेत.
जेव्हा काल माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दिली होती. खरंतर महिला आयोगाचे कर्तव्य आहे प्रत्येक स्त्रीसाठी लढावं. पण धनंजय मुंडे हे त्यांच्या मित्र पक्षातील आहेत, म्हणून चाकणकरांनी काम केलं नसेल आणि त्यांच्या तक्रारची दखल घेतली नसेल, तर हे नक्कीच चुकीचं आहे, असं म्हणत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.
एक कळत नाही ज्यांच्या कॅरेक्टरबद्दल इतक्या गोष्टी बाहेर येत आहेत. भ्रष्टाचाराच्या अमाप गोष्टी बाहेर येत आहेत. एवढेच नाही तर त्यांची दहशत किती मोठी आहे, या सगळ्या गोष्टी बाहेर येऊन सुद्धा मुख्यमंत्री देखील त्यांचा राजीनामा घेत नाही. अजित पवार देखील घेत नाही, हा आता प्रश्न सगळ्यांना पडला आहे, अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
मी एवढा मोठा कृषी घोटाळा बाहेर काढला शेतकऱ्यांचे अफाट पैसे त्यांनी खाल्ले यावर चकार शब्द अजित पवार किंवा मुख्यमंत्री बोलले नाहीत. त्यांची पाठराखण का करत आहेत? आता तर घरगुती हिंसाचाराच्या गोष्टींमध्ये कोर्टाने देखील म्हटलं असताना देखील त्यांना हे मंत्री म्हणून का हवे आहेत? हे कळत नाही, असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी सरकारला केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.