Beed News : बीडच्या गुन्हेगारीवर पोलिसांचा 'घाव', एकाच दिवशी ८० गुंडांना चौकीत बोलावलं, अन्...

Beed Superintendent Police Navneet Kavat Action Mode : एकंदरीत गु्न्हेगारी पार्श्वभूमीच्या ८० जणांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलीस दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
Superintendent of Police Navneet Kavat
Superintendent of Police Navneet KavatSaamTV
Published On

बीड : बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. जिल्ह्याभरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ८० जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास एमपीजी, हद्दपारी तसेच मकोकानुसार कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यामुळे आता अशा पद्धतीने कायदा हाती घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

एकंदरीत गु्न्हेगारी पार्श्वभूमीच्या ८० जणांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलीस दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या कारवाईचा उद्देश बीडमधील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हा आहे. अधीक्षकांनी या व्यक्तींना भविष्यात गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाईची चेतावणी दिली.

Superintendent of Police Navneet Kavat
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ७ आरोपींवर मकोका, वाल्मिक कराड हत्या प्रकरणातील आरोपी नाही

दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र वातावरण ढवळून निघालं आहे. आमदार धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा या हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. अद्यापही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाहीय. त्याचदरम्यान, काल अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे.

Superintendent of Police Navneet Kavat
Firecracker Factory Blast : फटाक्यांच्या फॅक्टरीत धडाधड स्फोट, मजुरांच्या किंकाळ्या, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com