Firecracker Factory Blast : फटाक्यांच्या फॅक्टरीत धडाधड स्फोट, मजुरांच्या किंकाळ्या, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू

Firecracker Factory Blast In Marathi : पश्चिम बंगालमधील फटाक्यांच्या फॅक्ट्रीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात २ महिलांसहित ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Firecracker Factory
Firecracker Factory BlastSaam tv
Published On

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्याच्या कल्याणीमध्ये एका फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झाल्यानंतर होरपळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

फटाक्यांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटातील जखमींवर जवाहरलाल नेहरू मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचा समावेश आहे.

Firecracker Factory
Turkey Ski Resort Fire : रिसॉर्टमध्ये अग्नितांडव! ६६ जणांचा होरपळून मृत्यू, ५१ जखमी

मीडिया रिपोर्टनुसार, नादिया कल्याणीजवळ रथतला येथील दाट वस्तीच्या ठिकाणी असलेल्या फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटात संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली आहे. भीषण स्फोटानंतर फॅक्टरीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कल्याणी पोलीस स्टेशन आणि अग्निशमन दलाच्या विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, फॅक्टरीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Firecracker Factory
Vasai Firing : राज्यात पुन्हा गोळीबाराचा थरार! वसईत दिवसाढवळ्या दोघांवर गोळीबार, नागरिक दहशतीत

स्फोट झाल्यानंतर फॅक्टरीची भिंत कोसळली आहे. स्फोटात बचावलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. फॅक्टरीत नेमका स्फोट कशामुळे झाला,याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये फटाकांच्या फॅक्टरीत स्फोट वाढू लागल्याने अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये काही फटाक्यांच्या फॅक्टरी बेकायदेशीररित्या सुरु असल्याचाही आरोप होत आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी बेकायदेशीरित्या सुरु असलेल्या विरोधातील आंदोलनाचाही फारसा फायदा झालेला नाही.

Firecracker Factory
Plane Fire: १६९ प्रवाशी भरलेल्या विमानाला भीषण आग, थरकाप उडणारी घटना कॅमेऱ्यात कैद

स्थानिक लोकप्रतिनिधी सुब्रत चक्रवर्ती यांनी म्हटलं की, मला बेकायदेशीरित्या सुरु असणाऱ्या फॅक्टरीविषयी माहिती नाही. स्फोट झाल्यानंतर फॅक्टरीविषयी माहिती झाली. स्थानिक आमदार अंबिका रॉय म्हणाले की, 'पोलिसांना सर्व काही माहिती असताना कारवाई केली नाही. स्फोटाच्या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. पोलिसांना सर्व माहीत असते. माझा देवावर विश्वास आहे. कायदा आणि सुव्यवस्था सारखी व्यवस्था राहिलेली नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com