Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी महाराष्ट्राच्या निकालावर बोलत आहेत, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल

Rahul Gandhi Statement : राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र निकालांवरुन काही प्रश्न उपस्थित केले होते. ईव्हीएम मशीनसंबंधित त्यांच्या वक्तव्यावरुन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam Tv
Published On

चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील निकालांवर वक्तव्य केले. राहुल यांनी महाराष्ट्रात ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचे म्हटले. त्यांच्या वक्तव्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

चंद्रशेखर बानवकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये 'दिल्लीत काँग्रेसचा सुपडासाफ होणार म्हणून घाबरलेले राहुल गांधी महाराष्ट्राच्या निकालावर बोलत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला. हरियाणाच्या जनतेनेही भाजपाला कौल दिला आणि आता उद्या दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस पार्टीचा सुपडासाफ होणार आहे' असे वक्तव्य केले.

'दिल्लीचा पराभव आणि काँग्रेस पार्टी दिल्लीत सुपडासाफ होणार म्हणून घाबरलेले राहुल गांधी महाराष्ट्राच्या निकालावर बोलत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांचा अपमान करत आहेत. खरं तर निवडणूक आयोगाने यापूर्वी त्यांना स्पष्टीकरण दिले आहे', असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Rahul Gandhi
Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित, बाईक अडवली म्हणून वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घातला

पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींच्या बाजूला सुप्रिया सुळे बसल्या होत्या. त्यांनी यापूर्वीच ईव्हीएम मशीनचा दोष नसतो, मतदारांचा दोष नाहीये आपण निवडणूक हरलो हे स्वीकारलं पाहिजे असे म्हटले होते. त्यासुद्धा मशीनवरच निवडून आल्या आहेत. स्वत: राहुल गांधी ईव्हीएम मशीनवर निवडून आले आहेत, असे विधान त्यांनी केले.

Rahul Gandhi
Karuna Sharma : धनंजय मुंडेंचे अनेक आका; करुणा शर्मांच्या गंभीर आरोपाने खळबळ

'जे सर्वेक्षण आले आहे, त्या आधारावर महाराष्ट्रात ज्या प्रकारे निकाल लागला, त्याच पद्धतीचा निकाल दिल्लीतही लागले याबद्दल आम्हाला खात्री आहे', असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आज वर्धा जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार सोहळ्यासाठीच्या कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Rahul Gandhi
Pune Traffic News : पुण्यातील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल, कसा कराल प्रवास? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com