Solar Eclipse , andhashraddha nirmulan samiti Saam Tv
महाराष्ट्र

Solar Eclipse 2022 : गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करु नका : 'अंनिस' चे आवाहन

‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ ही प्रबोधन मोहीमही सुरू केली आहे.

साम न्यूज नेटवर्क

Solar Eclipse 2022 : आज खंडग्रास सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिसणार आहे. या वेळी ३६ टक्के सूर्य झाकला जाणार आहे. ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या सावल्याचा खेळ असतो. मात्र, या ग्रहणात अनेक जण अंधश्रद्धेच्या आहारी जातात. या सुंदर खगोलीय घटनेला अशुभ न मानता गरोदर महिलांना (pregnant women) ग्रहण पाळायची सक्ती करू नका, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (andhashraddha nirmulan samiti) आवाहन केले असून, ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ ही प्रबोधन मोहीमही सुरू केली आहे. (Solar Eclipse 2022 Marathi News)

‘सातारा जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी ग्रहण काळात एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. सूर्यग्रहणसारख्या एका सुंदर खगोलीय घटनेला अशुभ मानणे चूक आहे. ग्रहण काळात कोणतेही हानिकारक किरणे निघत नाहीत, अन्न पाणी दूषित होत नाही. ग्रहण काळात गरोदर मातेला एका जागी अंधाऱ्या खोलीत बसविणे तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते. (Maharashtra News)

ग्रहण काळात गरोदर मातेने काम केलेस बाळाचे ओठ फाटतात. याला काहीही वैद्यकीय आधार नाही. मानवी गर्भाचा विकास आठव्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालेला असतो व त्यासाठी क्रोमोसोम्स व त्यावरील जनुके जबाबदार असतात. गर्भाचे व्यंग हे आनुवंशिकतेने किंवा नव्या म्युटेशन्समुळे होणाऱ्या जनुकीय वा गुणसूत्रांच्या दोषांमुळे किंवा पहिल्या दोन महिन्यांत काही औषधे खाल्ल्याने, तसेच फॉलेट व व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे तयार होतात.

तिसऱ्या व पाचव्या महिन्यातील सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांना काही दोष दिसले नसल्यास काहीच घाबरण्याचे कारण नाही. ग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होत नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून गरोदर मातेला ग्रहण पाळायला लावू नका, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, सुकुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्‍ज्ञ डॉ. शैला दाभोलकर, डॉ. शंतनू अभ्यंकर, डॉ. दीपक माने, वंदना माने, हौसेराव धुमाळ यांनी केले आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT