Amrit Bharat Express Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Amrit Bharat Express: जळगाव-भुसावळवरुन मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट! अमृत भारत एक्सप्रेसबाबत अपडेट

Amrit Bharat Express Stops at Bhusawal and Jalgaon: आता अयोध्या ते मुंबई आणि बनारस हडपसर अमृत भारत एक्सप्रेस जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबणार आहे. यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

Siddhi Hande

जळगाव, भुसावळमधून धावणार अमृत भारत एक्सप्रेस

अयोध्या ते मुंबई आणि बनारस हडपसर ट्रेनचा थांबा

प्रवाशांना होणार फायदा

जळगावच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या प्रवाशांचा मुंबई-पुणे प्रवास खूप वेगवान आणि आरामदायी होणार आहे. आता अधिक चांगली रेल्वे सेवा सुरु होणार आहे. आता भुसावळ आणि जळगाव स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेस थांबणार आहे. भुसावळ आणि जळगाव स्थानकांवरुन दोन अमृत भारत एक्सप्रेस धावतात. या एक्सप्रेसला या स्थानकांवर नियमित थांबा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही अमृत भारत एक्सप्रेस भुसावळ आणि जळगाव येथे थांबणार आहेत. बुधावरपासून ही सुविधा सुरु होणार आहे.

बनारस आणि अयोध्यावरुन मुंबई पुण्यासाठी अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. या दोन्ही ट्रेनला जळगाव आणि भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि जळगावरुन अयोद्धा किंवा बनारसला जाणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

अमृत भारत एक्सप्रेस सर्वसामान्यांचा विचार करुन सुरु करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये ११ डबे असणार आहे. यामळे अनारक्षित प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.कमी खर्चात तुम्हाला लांबचा पल्ला गाठता येणार आहे. ही ट्रेन जळगाव आणि भुसावळला थांबणार असल्याने तेथील प्रवाशांनाही फायदा होणार आहे.

अयोध्या ते मुंबई अमृत भारत एक्सप्रेस (Ayodhya to LTT Amrit Bharat Express)

ही ट्रेन मंगळवारी अयोध्या येथून दुपारी ४.४५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ९.० मिनिटांनी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. एकूण २८ तास २० मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. ही ट्रेन अनेक स्टेशनवर थांबणावर आहे.

बनारस-हडपसर ट्रेन (Banaras-Hadapsar Amrit Bharat Express)

ही अमृत भारत एक्सप्रेस मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल. तिसऱ्या दिवशी पहाटे ०.५५ मिनिटांनी हडपसरला पोहचेल. एकूण ३२ तास १० मिनिटांचा प्रवास असणार आहे. ही ट्रेन जळगाव आणि भुसावळसह अनेक स्टेशनवर थांबणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT