

मुंबईतून अमृत भारत एक्स्प्रेस धावणार
या एक्स्प्रेसमुळे मुंबईवरून अयोध्येला जाणं सोपं होणार
अवघ्या २७ तासांत अयोध्याला पोहचणं सोपं होणार आहे
मुंबईकरांसाठी आनंदीची बातमी आहे. मुंबईतून अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. या एक्स्प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला मुंबईवरून अयोध्याला जाणं अधिक सोपे होणार आहे. अयोध्येला दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अगदी कमी तासांत आणि आरामदायी होणार आहे. मुंबईतून अयोध्याला धावणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेस कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?, या ट्रेनचे तिकीट किती असण? या सर्व बाबी आपण जाणून घेणार आहोत...
अमृत भारत एक्स्प्रेस मुंबईतील एलटीटी म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार आहे. या ट्रेनमधून मुंबईवरून अयोध्येला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे. या अमृत भारत एक्स्प्रेसमुळे अवघ्या २८ तासांत अयोध्या गाठता येणार आहे. महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशमधील जे नागरिक मुंबईत कामानिमित्त राहतात. त्यांना देखील आपल्या गावाकडे जाण्यासाठी या ट्रेनचा फायदा होईल.
अमृत भारत एक्स्प्रेसला १२ थांबे आहेत. अमृत भारत एक्स्प्रेस अयोध्या कँट रेल्वे स्थानकावरून सुटेल त्यानंतर ही ट्रेन सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, जबलपूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, ठाणे या स्थानकावर थांबून नंतर लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल. ही ट्रेन अयोध्या कँट रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ४:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९:०५ वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. अमृत भारत एक्स्प्रेसचा फायदा महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि भुसावळ या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना देखील होईल. त्यांना या ट्रेनने सुसाट प्रवास करता येईल.
अयोध्या-मुंबई अमृत भारत एक्स्प्रेस अयोध्या कँट या स्थानकातून संध्याकाळी सुटेल. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उशिरा मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या ट्रेनच्या माध्यमातून अयोध्या ते मुंबई हा प्रवास फक्त २८ तासांत पूर्ण होईल. या दोन नवीन रेल्वे गाड्यांची सेवा सुरु झाल्याने देशात सध्या कार्यान्वित असलेल्या एकूण अमृत भारत एक्स्प्रेसची संख्या ६६ वर पोहोचली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस प्रमाणे अमृत भारत एक्स्प्रेसला देखील प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या ट्रेनची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये २२ डबे आहेत. ११ जनरल क्लास म्हणजे अनारक्षित डबे, ८ स्लीपर क्लास डबे, २ गार्ड व्हॅन आणि १ पॅन्ट्री कार असणार आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार आहे. स्नॅक टेबल, चार्जिंग पॉईंट असलेले मोबाइल होल्डर आणि मॉड्यूलर टॉइलेट्स या ट्रेनमध्ये असणार आहेत. ही ट्रेन प्रवाशांना कमी तिकीटामध्ये चांगली सुविधा देते. अमृत भारत एक्स्प्रेस ही नॉन एसी ट्रेन आहे. मुंबई ते अयोध्या अमृत भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना स्लीपर क्लाससाठी ५९० ते ७००रुपये करावा लागेल. तर जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी अंदाजे ३३० रुपये खर्च करावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.