Amravati Doctor Woman News Saam TV
महाराष्ट्र

Amravati Crime News : भावी डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; धक्कादायक घटनेनं अमरावतीत खळबळ

Amravati Doctor Woman News : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील गुरुदेवनगर परिसरात घडली.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील गुरुदेवनगर परिसरात घडली. संस्कृती महेंद्र वानखेडे (वय २३) असे मृतक युवतीचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. संस्कृतीने इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळ नांदेड जिल्ह्यातील (Nanded Latest News) असलेली संस्कृतीने वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावतीत आली होती.

गुरुदेवनगर येथील गुडघे यांच्याकडे ती किरायाने रुम घेऊन राहत होती. संस्कृतीने आपलं वैद्यकीय शिक्षण जिल्ह्यातील (Amravati Crime News) गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातून पूर्ण केलं. सध्या संस्कृती ती वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप करत होती.

काही दिवसांतच तिला इंटर्नशिप पूर्ण केल्याचा दाखला देखील मिळणार होता. मात्र, त्याआधीच तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, ही बाब खोली मालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पंचनामा करून संस्कृती हिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तसेच तिच्या आत्महत्येबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. भावी डॉक्टर तरुणीने अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूर परिस्थिती कायम, सर्व शाळा-अंगणवाडीला आज सुट्टी

Success Story: दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली, दिली UPSC परीक्षा, पहिल्या प्रयत्नात IPS; स्वीटी सहरावत यांचा प्रवास

एक नंबर! इलेक्ट्रिक टू-व्हीलर मिळेल सब्सिडी; स्वस्तात येईल बाईक, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Horoscope: प्रेमाची कळी खुलणार, जवळीक वाढेल; नाराजी होईल दूर

SCROLL FOR NEXT